बातम्या

महालक्ष्मी  देवस्थान परिसर विकासासाठी प्राथमिक सर्वेक्षणाला सुरुवात

Preliminary survey begins for development of Mahalaxmi Temple premises


By nisha patil - 5/5/2026 12:22:31 PM
Share This News:



महालक्ष्मी  देवस्थान परिसर विकासासाठी प्राथमिक सर्वेक्षणाला सुरुवात

 

श्री करवीर निवासिनी महालक्ष्मी/अंबाबाई देवस्थान परिसर विकास आराखड्यांतर्गत प्राथमिक सर्वेक्षणास आजपासून सुरुवात करण्यात आली आहे. हे सर्वेक्षण तीन पथकांमार्फत राबविण्यात येत असून प्रत्येक पथकात कोल्हापूर महानगरपालिकेचे कनिष्ठ अभियंता पथक प्रमुख म्हणून कार्यरत आहेत.

 

प्रत्येक पथकात एक ग्राम महसूल अधिकारी, एक परिरक्षण भूमापक तसेच घरफाळा विभागाचे दोन कर्मचारी यांचा समावेश आहे. या प्राथमिक सर्वेक्षणामध्ये एकूण 137  सिटी सर्व्हे क्रमांक समाविष्ट आहेत. त्यापैकी आजच्या पहिल्याच दिवशी 35 सिटी सर्व्हे क्रमांकांचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून 7 सिटी सर्व्हे क्रमांकांचे काम अंशतः पूर्ण झाले आहे. सर्वेक्षण प्रक्रियेला मिळकतधारकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. काही ठिकाणी मालकांऐवजी कुळ वास्तव्यास असल्याने संबंधित मिळकतधारकांचा संपर्क क्रमांक मिळवून त्यांच्याशी संपर्क साधण्याचे काम सुरू आहे.

 

या सर्वेक्षणातून संकलित होणाऱ्या माहितीच्या आधारेच महालक्ष्मी/ अंबाबाई देवस्थान परिसर विकासाच्या पुढील टप्प्यांची कार्यवाही करण्यात येणार आहे. त्यामुळे सर्व मिळकतधारकांनी सर्वेक्षणासाठी येणाऱ्या पथकांना आवश्यक ते सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.


महालक्ष्मी  देवस्थान परिसर विकासासाठी प्राथमिक सर्वेक्षणाला सुरुवात
Total Views: 9