बातम्या

प्रेम यादव खून प्रकरणातील मुख्य आरोपी कोल्हापूरमधून जेरबंद

Prem yadav crime news


By nisha patil - 12/15/2025 4:26:27 PM
Share This News:



प्रेम यादव खून प्रकरणातील मुख्य आरोपी कोल्हापूरमधून जेरबंद

बिहारच्या छापरा जिल्ह्यातील कुख्यात गैंगस्टर प्रेम यादव याचा १८ नोव्हेंबर रोजी धनवाद (झारखंड) येथे गोळीबार करून खून करण्यात आला होता. या प्रकरणी झारखंडमधील शरिया पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेता विशेष तपास पथक स्थापन करण्यात आले होते.

दि. १३ डिसेंबर रोजी झारखंड पोलिसांकडून आरोपी कोल्हापूर जिल्ह्यात असल्याची माहिती मिळाल्यानंतर मा. पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने शोधमोहीम राबवली. पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पथकाने शिये, रामनगर परिसरातून मुख्य आरोपी रोहित सिंग व त्याचा साथीदार कुणाल तारकेश्वर मांझी यांना ताब्यात घेतले. पुढील कारवाईसाठी दोन्ही आरोपी झारखंड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहेत.

प्राथमिक तपासात हा खून बिहारमधील टोळी युद्धातून झाल्याचे स्पष्ट होत असून ताब्यात घेतलेल्या आरोपींवर खून व जबरी चोरीसारखे गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती आहे.


प्रेम यादव खून प्रकरणातील मुख्य आरोपी कोल्हापूरमधून जेरबंद
Total Views: 51