बातम्या
बहुसंख्य हिंदूंच्या मागण्यांसाठी बेमुदत उपोषणाची तयारी — सकल हिंदू समाजाचा निर्धार
By Administrator - 6/27/2025 4:23:59 PM
Share This News:
बहुसंख्य हिंदूंच्या मागण्यांसाठी बेमुदत उपोषणाची तयारी — सकल हिंदू समाजाचा निर्धार
आई अंबाबाईच्या चरणी ओटी भरून आंदोलनासाठी आशीर्वादाची याचना
सकल हिंदू समाज आणि हिंदू जन संघर्ष समिती यांच्या वतीने बहुसंख्य हिंदू समाजाच्या विविध मागण्यांसाठी छत्रपती शिवाजी चौक येथे बेमुदत उपोषण करण्यात येणार आहे. या आंदोलनाला अध्यात्मिक बळ मिळावे व शासनाने सर्व मागण्या मान्य कराव्यात, यासाठी आज सकाळी श्री अंबाबाई मंदिरात ओटी भरून साकडे घालण्यात आले.
यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी “आई अंबाबाई आंदोलनास शक्ती दे” अशी प्रार्थना केली आणि “देव, देश आणि धर्मासाठी आमचे युद्ध सुरू आहे, जिंकू किंवा मरू” अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. लवकरच हे आंदोलन अधिक व्यापक स्वरूप धारण करेल, असे संकेतही संयोजकांनी दिले.
बहुसंख्य हिंदूंच्या मागण्यांसाठी बेमुदत उपोषणाची तयारी — सकल हिंदू समाजाचा निर्धार
|