शैक्षणिक
इयत्ता 12 वी बोर्ड परीक्षा आजरा केंद्राची तयारी पूर्ण...
By nisha patil - 9/2/2026 6:49:52 PM
Share This News:
इयत्ता 12 वी बोर्ड परीक्षा आजरा केंद्राची तयारी पूर्ण...
*आजरा (हसन तकीलदार):- इयत्ता बारावी बोर्ड लेखी परीक्षा दिनांक 10 फेब्रुवारी 2026 पासून सुरू होत आहे. आजरा तालुक्याच्या ठिकाणी एकमेव आजरा महाविद्यालय आजरा ( 0531 ) हे परीक्षा केंद्र आहे. या परीक्षेसाठी आजरा ज्युनिअर कॉलेज, व्यंकटराव जुनिअर कॉलेज, पंडित दीनदयाळ जुनिअर कॉलेज,ओम पॅरामेडिकल कॉलेज व डॉ. झाकीर हुसेन उर्दू कॉलेज, आजरा इत्यादी कॉलेजचे एकूण 747 विद्यार्थी प्रविष्ट झाले आहेत. परीक्षेसाठी प्रविष्ट होणारी मोठी विद्यार्थी संख्या लक्षात घेऊन त्यांची बैठक व्यवस्था आजरा महाविद्यालय व आजरा हायस्कूल येथे करण्यात आली आहे. एच एस सी बोर्डाच्या भीतीमुक्त व कॉपीमुक्त अभियाना अंतर्गत कोणतेही गैरप्रकार होणार नाहीत आणि विद्यार्थ्यांची अन्य कोणतीही गैरसोय होणार नाही याची दक्षता केंद्र संचालक, अधीक्षक, उपप्राचार्य व प्राचार्य यांनी घेतली आहे. बोर्डाकडून वेळोवेळी होणाऱ्या सर्व सूचनांचे काटेकोररित्या पालन करण्यात आले आहे. तसेच या शैक्षणिक वर्षातील संपूर्ण परीक्षा ही सीसीटीव्हीच्या निगराणी खाली होणार आहेत.
दररोजची बैठक व्यवस्था बदलती असणार आहे.बैठक व्यवस्था आदल्या दिवशी विद्यार्थ्यांच्या माहितीसाठी फलकावर प्रसिद्ध केली जाईल.परीक्षेसाठी सुपरवायझर,कर्मचारी,वर्गांची व्यवस्था करून संबंधितांना पर्यवेक्षणासंबंधीच्या सूचना देण्यात आल्या आहेत. परीक्षार्थीनी आपापल्या विषयाच्या वेळापत्रकाप्रमाणे परीक्षेस वेळेत हजर राहून परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी चे आवाहन केंद्रप्रमुख मनोजकुमार पाटील सर यांनी केले आहे
इयत्ता 12 वी बोर्ड परीक्षा आजरा केंद्राची तयारी पूर्ण...
|