विशेष बातम्या

इचलकरंजी दौऱ्यासाठी तयारीला जोर – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस २३ मे रोजी प्रथमच भेट देणार

Preparations in full swing for Ichalkaranji visit

By nisha patil - 5/21/2025 1:33:17 PM
Share This News:

इचलकरंजी दौऱ्यासाठी तयारीला जोर – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस २३ मे रोजी प्रथमच भेट देणार

इचलकरंजीसाठी ऐतिहासिक क्षण ठरणार आहे, कारण महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब २३ मे २०२५ रोजी प्रथमच इचलकरंजी दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या स्वागतासाठी आणि नियोजनासाठी हातकणंगले मंडलची विशेष बैठक श्रीहरी मल्टीपर्पज हॉल, हातकणंगले येथे पार पडली.

ही बैठक आमदार डॉ. राहुल आवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. बैठकीत दौऱ्याच्या तयारी, जनजागृती मोहिमा आणि स्वागत समितीबाबत सविस्तर चर्चा झाली.

या बैठकीस भाजप जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकर, शहराध्यक्ष अमर इंगवले, शेतकरी नेते, नगरसेवक, कारखान्यांचे पदाधिकारी व विविध बूथ प्रमुख उपस्थित होते. सर्वांनी दौऱ्याचे यशस्वी आयोजन करण्याचा निर्धार व्यक्त केला.

इचलकरंजी दौऱ्यासाठी तयारीला जोर – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस २३ मे रोजी प्रथमच भेट देणार
Total Views: 119