बातम्या
नांदणी मठात हत्ती पुनर्वसन केंद्र उभारण्याची तयारी
By nisha patil - 8/20/2025 5:37:59 PM
Share This News:
नांदणी मठात हत्ती पुनर्वसन केंद्र उभारण्याची तयारी
वनताराच्या अधिकाऱ्यांची जागेची पाहणी, ६ एकर जागेत सुविधा केंद्र उभारणार
माधुरी हत्तीच्या देखभालीसाठी नांदणी मठाच्या जागेत हत्ती पुनर्वसन केंद्र उभारण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. वनतारा, जामनगर येथील वैद्यकीय व बांधकाम विभागाच्या तज्ज्ञ अधिकाऱ्यांनी मठाच्या ६ एकर जागेची पाहणी करून येथे सर्व सुविधायुक्त पुनर्वसन केंद्र उभारणे शक्य असल्याचे सांगितले.
या केंद्रात हत्तींसाठी हायड्रो थेरपी, वैद्यकीय सुविधा तसेच सांगली-कोल्हापूर व सीमाभागातील हत्तींच्या उपचार व सोशलायझेशनची सोय उपलब्ध होणार आहे. नांदणी परिसरातील हवामान हत्तींसाठी अनुकूल असल्याचे वनताराच्या अधिकाऱ्यांनी नमूद केले.
नांदणी मठात हत्ती पुनर्वसन केंद्र उभारण्याची तयारी
|