विशेष बातम्या
पुणे जिल्हा पर्यटन आराखड्याचे अजित पवार यांच्या बैठकीत सादरीकरण
By nisha patil - 4/29/2025 12:16:23 AM
Share This News:
पुणे जिल्हा पर्यटन आराखड्याचे अजित पवार यांच्या बैठकीत सादरीकरण
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत पुणे जिल्हा पर्यटन विकास आराखड्याचे सादरीकरण झाले. पॅराग्लायडिंग स्पर्धा (मुळशी), ग्रॅन्ड सायकलिंग चॅलेंज, बारामती-इंदापूर येथे हॉट एअर बलून फेस्टीव्हल, पवना धरणात जलक्रीडा सुविधा, ऐतिहासिक गडकिल्ल्यांचा विकास, सांस्कृतिक महोत्सव अशा विविध उपक्रमांचा आराखड्यात समावेश आहे.
पुढील पाच वर्षांत पुणे जिल्ह्यात एक कोटी पर्यटक वाढवण्याचे व पन्नास हजार थेट व पाच लाख अप्रत्यक्ष रोजगार निर्मितीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. भीमाशंकर व सिंहगड किल्ला विकास आराखड्याचा आढावा घेत, ऐतिहासिक ठिकाणांचे जतन करण्याचे निर्देशही अजित पवार यांनी दिले. तसेच प्रतापगड पायथ्यावरील जिवाजी महाले यांच्या स्मारकाचे काम तातडीने पूर्ण करण्याचे आदेश दिले.
पुणे जिल्हा पर्यटन आराखड्याचे अजित पवार यांच्या बैठकीत सादरीकरण
|