बातम्या
मुख्यमंत्र्यांसमोर शिक्षकांच्या प्रश्नांची मांडणी — अभयकुमार साळुंखे यांचे निवेदन
By nisha patil - 11/11/2025 4:18:28 PM
Share This News:
मुख्यमंत्र्यांसमोर शिक्षकांच्या प्रश्नांची मांडणी — अभयकुमार साळुंखे यांचे निवेदन
केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांना वाढदिवस शुभेच्छा — शिक्षक मतदार नोंदणीवर चर्चा
संस्थेचे कार्याध्यक्ष अभयकुमार साळुंखे यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेऊन शिक्षण क्षेत्रातील प्रलंबित प्रश्नांवर सविस्तर चर्चा केली. यावेळी जुनी पेन्शन योजना (OPS) आणि टप्पा अनुदान विषयांवर निवेदन सादर करण्यात आले.
दरम्यान, अभयकुमार साळुंखे यांनी केंद्रीय नागरी विमान वाहतूक व सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ (आण्णा) यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या.
या भेटीत पुणे विभागातील शिक्षक मतदार नोंदणी आणि विविध शैक्षणिक मुद्द्यांवरही चर्चा झाली.
मुख्यमंत्र्यांसमोर शिक्षकांच्या प्रश्नांची मांडणी — अभयकुमार साळुंखे यांचे निवेदन
|