राजकीय
माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे कोल्हापूर विमानतळावर जिल्हा प्रशासनाकडून स्वागत
By nisha patil - 12/11/2025 12:07:17 PM
Share This News:
कोल्हापूर, दि. १२ : माजी राष्ट्रपती माननीय रामनाथ कोविंद यांचे आज कोल्हापूर विमानतळावर आगमन झाले. यावेळी जिल्हा प्रशासनाच्यावतीने जिल्हाधिकारी अमोल येडगे, मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. आणि जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
स्वागत समारंभावेळी पद्मश्री डॉ. विकास महात्मे, संजय घोडावत विद्यापीठाचे कुलगुरू उद्धव भोसले, विश्वस्त विनायक भोसले, अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे, विमानतळ संचालक अनिल शिंदे, राधानगरी प्रांताधिकारी प्रसाद चौगुले, आणि करवीर तहसीलदार स्वप्नील रावडे आदी मान्यवर उपस्थित होते.
या प्रसंगी जिल्हा प्रशासनाच्यावतीने जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी माजी राष्ट्रपतींना कोल्हापूर जिल्हा पर्यटन पुस्तिका भेट म्हणून प्रदान केली. त्यांच्या भेटीमुळे कोल्हापूर जिल्हा प्रशासनामध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे कोल्हापूर विमानतळावर जिल्हा प्रशासनाकडून स्वागत
|