बातम्या
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘मित्र विभूषण’ पुरस्कार
By nisha patil - 4/5/2025 12:31:44 AM
Share This News:
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘मित्र विभूषण’ पुरस्कार
श्रीलंकेकडून विशेष सन्मान; मोदींची भावनिक प्रतिक्रिया
कोलंबो – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना श्रीलंका सरकारने ‘मित्र विभूषण’ पुरस्काराने सन्मानित केले आहे. श्रीलंका दौऱ्यावर असलेल्या मोदींना द्विपक्षीय संबंध बळकट करणाऱ्या योगदानाबद्दल हा गौरव प्रदान करण्यात आला. हा मोदींना परदेशातून मिळालेला २२ वा आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहे.
भारत आणि श्रीलंकेतील संस्कृती, वारसा आणि मैत्रीपूर्ण संबंधांना बळकटी देण्यासाठी मोदींनी केलेल्या प्रयत्नांची दखल घेत श्रीलंकेने त्यांना हा पुरस्कार दिला.
पुरस्कार स्वीकारल्यानंतर पंतप्रधान मोदी म्हणाले, "हा सन्मान माझा नाही, तर १४० कोटी भारतीयांचा आहे. भारत-श्रीलंकेतील घनिष्ठ नातं या पुरस्कारातून दिसून येतं. हे माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे."
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘मित्र विभूषण’ पुरस्कार
|