शैक्षणिक
शिरढोणच्या बाणदार हायस्कूलला राजकुमार कोईक कडून प्रिंटर भेट
By nisha patil - 2/14/2026 1:02:40 PM
Share This News:
शिरढोणच्या बाणदार हायस्कूलला राजकुमार कोईक कडून प्रिंटर भेट
शिरढोण प्रतिनिधी (संजय गायकवाड) :- रयत शिक्षण संस्थेचे रमजान शेठ बाणदार विद्यालय शिरढोण शाखेस माजी विद्यार्थी श्री राजकुमार भुपाल कोईक यांच्याकडून विद्यालयास प्रिंटर भेट देण्यात आले. विद्यालयास मदतीचा ओघ अविरतपणे सुरूच आहे
"स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद" स्वीकारून पद्मभूषण डॉ कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या विचारांचा वसा व वारसा जपणारे विद्यार्थी आपल्या शाळेस कधीही विसरत नाहीत याचा प्रत्यय रमजान शेठ बाणदार विद्यालय शिरढोण शाखेत येत आहे.. स्कूल कमिटी, माजी विद्यार्थी संघ, सल्लागार समिती, शालेय व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून विद्यालयाच्या पुनर्निर्मानाचे काम अंतिम टप्प्यात असून आज विद्यालयाचे माजी विद्यार्थी राजकुमार कोईक यांनी अत्यावश्यक असलेले प्रिंटर मुख्याध्यापक श्री खरात सर यांच्याकडे सुपूर्द केले.
यावेळी स्कूल कमिटी सदस्य अविनाश पाटील, रणजीत पुजारी, माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष डॉ. कुमार पाटील, सुधीर गायकवाड, पप्पू मुंगळे,विकास चौगुले, यांच्या सह विद्यालयातील शिक्षक उपस्थित होते.
शिरढोणच्या बाणदार हायस्कूलला राजकुमार कोईक कडून प्रिंटर भेट
|