बातम्या
जेष्ठ शिक्षणतज्ज्ञ श्री. डी. बी. पाटील यांची जयंती उत्साहात साजरी
By nisha patil - 12/11/2025 12:32:36 PM
Share This News:
जेष्ठ शिक्षणतज्ज्ञ श्री. डी. बी. पाटील यांची जयंती उत्साहात साजरी
कोल्हापूर दि: 11 येथील श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस कोल्हापूर या संस्थेच्या महाराष्ट्र हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज कोल्हापूर या शाळेत जेष्ठ शिक्ष्णतज्ज्ञ कै. श्री डी. बी. पाटील साहेब यांची 91 वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस कोल्हापूर या संस्थेच्या व महाराष्ट्र राज्याच्या शिक्षण क्षेत्रात कै. डी. बी. पाटील साहेबांनी दिलेले योगदान उल्लेखनीय आहे. कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघ, को. जि. मा. शि पतसंस्था, शैक्षणिक व्यासपीठ यासारख्या संस्थांच्या उभारणीसाठी आपले आयुष्य व्यतीत करणारे डी. बी. पाटील साहेब हेच खरे महान ऋषी आहेत. असे मत महाराष्ट्र हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य श्री. यू. आर. आतकीरे यांनी व्यक्त केले. ते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी प्राचार्य यू. आर. आतकिरे, उपमुख्याध्यापक श्री. एस. ए. जाधव यांच्या शुभहस्ते कै. श्री. डी. बी. पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
या कार्यक्रमा वेळी उपप्राचार्या सौ. व्ही. एस. कांबळे, पर्यवेक्षक श्री. एस. व्ही. शिंदे, सौ. एस. एस. ठोंबरे, टेक्निकल विभाग प्रमुख श्री. बी. बी. मिसाळ, क्रीडा विभाग प्रमुख श्री. प्रदीप साळोखे, शिक्षक- शिक्षिका व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन क्रीडा शिक्षक श्री संदीप पाटील यांनी केले.
जेष्ठ शिक्षणतज्ज्ञ श्री. डी. बी. पाटील यांची जयंती उत्साहात साजरी
|