बातम्या

प्रायव्हसीचा भंग सुरूच... सरकार गप्प का?” :  सतेज पाटील 

Privacy violations continue


By nisha patil - 7/17/2025 11:43:03 AM
Share This News:



प्रायव्हसीचा भंग सुरूच... सरकार गप्प का?” :  सतेज पाटील 

 राज्यात सीसीटीव्ही बसवण्याचा निर्णय घेतला... पण धोरणाचं काय?

राज्यातील सर्व शासकीय आस्थापनांमध्ये सीसीटीव्ही बसवण्याचा निर्णय शासनाने घेतला असला, तरी यासाठी आवश्यक निधी, वेळेची मर्यादा, अंमलबजावणीची पद्धत आणि खासगी आस्थापनांमध्ये होत असलेल्या गोपनीयतेच्या भंगाबाबत सरकारने अजून स्पष्ट धोरण जाहीर केलेले नाही. या संदर्भात काँग्रेसचे विधानपरिषदेतील गटनेते आमदार सतेज (बंटी) पाटील यांनी विधिमंडळात प्रश्न उपस्थित केला.

ते म्हणाले, "खासगी सीसीटीव्ही फुटेज व्हायरल होणे म्हणजे नागरिकांच्या प्रायव्हसीवर घाला आहे. हे थांबवण्यासाठी सरकारने कोणतेही ठोस धोरण अद्याप आखलेले नाही."

या प्रश्नाला उत्तर देताना राज्यमंत्री पंकज भोयर यांनी सांगितले की, "सध्या राज्यात सीसीटीव्ही लावण्याच्या प्रक्रियेसाठी एसओपी तयार करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले असून, येत्या अधिवेशनात यासंदर्भातील धोरण सादर करण्यात येईल."..


प्रायव्हसीचा भंग सुरूच... सरकार गप्प का?” :  सतेज पाटील 
Total Views: 54