बातम्या

वृक्षसंवर्धनासाठी प्रायव्हेट हायस्कूलचा उपक्रम — “एक पेड मां के नाम” अंतर्गत ३०० वृक्षांचे रोपण

Private High Schools initiative for tree conservation


By nisha patil - 1/8/2025 10:15:32 PM
Share This News:



वृक्षसंवर्धनासाठी प्रायव्हेट हायस्कूलचा उपक्रम — “एक पेड मां के नाम” अंतर्गत ३०० वृक्षांचे रोपण

कोल्हापूर, दि. १ ऑगस्ट —प्रायव्हेट हायस्कूल, कोल्हापूर आणि कोल्हापूर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने कळंबा परिसरातील पुईखडी, क्रांतिसिंह नाना पाटील नगरजवळ जवळपास ३०० वृक्षांचे रोपण करण्यात आले.हा उपक्रम "एक पेड मां के नाम", लोकमान्य टिळक पुण्यतिथी, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती व प्रायव्हेट एज्युकेशन सोसायटीच्या वर्धापन दिनानिमित्त राबवण्यात आला.

वड, करंज, लिंब, बाभूळ अशा वृक्षांची लागवड करण्यात आली. या कार्यक्रमात एनसीसी, इको क्लबचे विद्यार्थी व पालक यांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला.

महानगरपालिकेचे उद्यान अधीक्षक समीर व्याघ्रांबरे, राम चव्हाण, विनोद पारमेकर, शशी लाड आदींचे विशेष सहकार्य लाभले.कार्यक्रमाचे प्रमुख संयोजन आर. डी. जाधव सर यांनी केले.
मुख्याध्यापक जी. एस. जांभळीकर सर, उपमुख्याध्यापक पी. एम. जोशी, जिमखाना प्रमुख डी. सी. पाटील, एनसीसी प्रमुख डी. एम. रेडेकर, एस. एस. माने, व शिक्षक ए. डी. पाटील, आर. एम. कुंभार यांचे मार्गदर्शन लाभले.

मुख्याध्यापक जांभळीकर यांनी पर्यावरण रक्षणासाठी पालक आणि विद्यार्थ्यांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन केले.


वृक्षसंवर्धनासाठी प्रायव्हेट हायस्कूलचा उपक्रम — “एक पेड मां के नाम” अंतर्गत ३०० वृक्षांचे रोपण
Total Views: 126