बातम्या
38 व्या वर्षी प्रिया मराठे यांनी कर्करोगाशी हार मानली
By nisha patil - 1/9/2025 12:42:38 PM
Share This News:
38 व्या वर्षी प्रिया मराठे यांनी कर्करोगाशी हार मानली
मनोरंजनसृष्टीत शोककळा
मराठी व हिंदी मालिकांमधील लोकप्रिय अभिनेत्री प्रिया मराठे हिचं काल करकर (कॅन्सर) या गंभीर आजारामुळे दुःखद निधन झालं. वयाच्या केवळ 38 व्या वर्षी तिचा जीवनप्रवास थांबला.
प्रिया मराठे ही “तुझेच मी गीत गात आहे”, “चार दिवस सासूचे”, “पवित्र रिश्ता” आणि “बडे अच्छे लगते हैं” यांसारख्या गाजलेल्या मालिकांमधून घराघरात पोहोचली होती. तिच्या सहजसुंदर अभिनयामुळे आणि मनमोकळ्या स्वभावामुळे तिने प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं होतं.
तरुण वयातच तिचं जाणं ही केवळ कुटुंबासाठीच नव्हे, तर संपूर्ण मराठी-हिंदी मनोरंजनविश्वासाठी एक मोठी पोकळी आहे. प्रेक्षकांच्या डोळ्यात आज अश्रू आहेत आणि एकच भावना व्यक्त होत आहे – “खूप लवकर गेलीस प्रिया…”
38 व्या वर्षी प्रिया मराठे यांनी कर्करोगाशी हार मानली
|