राजकीय

भाजपाच्या किल्ले स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद; बक्षीस वितरण सोहळा उत्साहात संपन्न

Prize distribution ceremony concluded with enthusiasm


By nisha patil - 12/5/2026 1:01:39 PM
Share This News:



भाजपाच्या किल्ले स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद; बक्षीस वितरण सोहळा उत्साहात संपन्न

 

छत्रपती शिवरायांचा इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचवणारी किल्ले स्पर्धा; खासदार धनंजय महाडिक यांची भूमिका

कोल्हापूर : भाजपा कोल्हापूरच्या वतीने आयोजित किल्ले स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ नागाळा पार्क येथील भाजपा जिल्हा कार्यालयात उत्साहात पार पडला. खासदार धनंजय महाडिक यांच्या संकल्पनेतून झालेल्या या स्पर्धेला तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.


यावेळी बोलताना खासदार महाडिक यांनी छत्रपती शिवरायांचा इतिहास, वास्तुकला आणि युद्धनीती नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी किल्ले स्पर्धा महत्त्वपूर्ण असल्याचे सांगितले. पुढील वर्षी ५०० स्पर्धकांसह जिल्हास्तरीय भव्य स्पर्धा घेणार असल्याची घोषणाही त्यांनी केली.


स्पर्धेत संध्यामठ तरुण मंडळ व साठमारी तरुण मंडळ यांनी प्रथम क्रमांक पटकावला. वीर संभाजी तरुण मंडळ भोसलेवाडी व मावळा ग्रुप गुरुवार पेठ यांनी द्वितीय, तर शिवगर्जना प्राचीन युद्ध कला संस्था व शिवनेरी तरुण मंडळ यांनी तृतीय क्रमांक मिळवला. विजेत्यांना रोख रक्कम व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.


छत्रपती शिवरायांचा इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचवणारी किल्ले स्पर्धा; खासदार धनंजय महाडिक यांची भूमिका
Total Views: 16