बातम्या
भडगाव येथे किल्ला महोत्सव समितीच्या वतीने बक्षीस वितरण समारंभ उत्साहात संपन्न
By nisha patil - 12/11/2026 1:54:24 PM
Share This News:
भडगाव येथे किल्ला महोत्सव समितीच्या वतीने बक्षीस वितरण समारंभ उत्साहात संपन्न
कागल प्रतिनिधी : अजित बोडके भडगाव : किल्ला महोत्सव समिती भडगाव यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या किल्ला बनवा स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला.
भडगाव येथील अंबाबाई देवालय येथे बुधवार, दि. ११ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७.३० वाजता या समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी स्पर्धेत सहभागी झालेल्या स्पर्धकांचा रोख बक्षीस व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे :
प्रथम क्रमांक : श्री. अमर चौगुले - ₹१५०१ ( युवा काँग्रेस तालुकाप्रमुख व सतेज ऊर्फ बंटी पाटील फाऊंडेशन)
द्वितीय क्रमांक : श्री. बी. एम. पाटील - ₹१००१ (सरपंच, भडगाव)
तृतीय क्रमांक : श्री. मच्छिंद्रनाथ खतकर - ₹७०१ (भडगाव सेंटर) व श्री. विक्रमसिंह पाटील - ₹७०१ (समाजसेवक, कागल)
उत्तेजनार्थ बक्षीस : श्री. दिलीप चौगुले (माजी सरपंच, भडगाव)
सर्व क्रमांकांचे चषक पैलवान श्री. दयानंद खतकर (राष्ट्रीय कुस्ती प्रशिक्षक) यांच्या हस्ते देण्यात आले.
यावेळी किल्ला परीक्षक म्हणून श्री. समाधान सोनारकर (इतिहास अभ्यासक व शस्त्रसंग्रहक) यांनी काम पाहिले. त्यांनी उपस्थित मुलांना किल्ल्यांचे महत्त्व, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आणि गड-किल्ल्यांचे संवर्धन याबाबत मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचे संयोजन विक्रमसिंह पाटील व जालिंदर खतकर यांनी केले होते. यावेळी भडगाव व परिसरातील ग्रामस्थ, शिवप्रेमी, विद्यार्थी व स्पर्धक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून सिद्धाप्पा खतकर, रामचंद्र पाटील, किरण पाटील, वैभव भांडवले, दयानंद खतकर, युवक काँग्रेस अध्यक्ष अमर चौगुले, बी. एम. पाटील, मच्छिंद्रनाथ खतकर, दिलीप चौगुले यांच्यासह भडगाव किल्ला महोत्सव समितीचे समाधान सोनाळकर, जालिंदर खतकर, विक्रम पाटील आदी उपस्थित होते.
दिवाळीच्या सुट्टीनिमित्त मुलांमध्ये किल्ला बनवण्याची आवड निर्माण व्हावी, इतिहासाची ओळख व्हावी या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते, असे आयोजकांनी सांगितले.
भडगाव येथे किल्ला महोत्सव समितीच्या वतीने बक्षीस वितरण समारंभ उत्साहात संपन्न
|