बातम्या

नियोजनबद्ध शेतीतून उत्पादकता वाढ शक्य – पालकमंत्री प्रकाश आबिटकर

Productivity can be increased through planned agriculture


By nisha patil - 10/13/2025 5:28:58 PM
Share This News:



नियोजनबद्ध शेतीतून उत्पादकता वाढ शक्य – पालकमंत्री प्रकाश आबिटकर

कोल्हापूर/नरतवडे, दि. १३ : नियोजनबद्ध शेती आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरातून शेतकरी उत्पादकता वाढवू शकतात, असे मत पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी व्यक्त केले. नरतवडे येथे कृषी समृद्धी योजनेचा जिल्हास्तरीय शुभारंभ व तेलबिया उत्पादन प्रशिक्षण सत्र पार पडले.

या मेळाव्यात प्रगतशील शेतकरी, महिला बचत गट, कृषी विज्ञान केंद्रातील तज्ज्ञ आणि कृषी विभाग अधिकारी उपस्थित होते. आबिटकर यांनी शेतकऱ्यांना जमिनीचा अभ्यास करून योग्य पीक निवडीचा सल्ला दिला. केंद्र व राज्य शासनाच्या आधुनिक शेती योजनांचा लाभ घ्यावा, असेही त्यांनी आवाहन केले.

कार्यक्रमात प्रगतशील शेतकऱ्यांचा सन्मान, कृषी माहिती पुस्तिका अनावरण तसेच तंत्रज्ञान व प्रक्रिया उद्योगावरील मार्गदर्शन सत्रे घेण्यात आली. तेलबिया अभियानातून देश खाद्यतेलात स्वयंपूर्ण होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.


नियोजनबद्ध शेतीतून उत्पादकता वाढ शक्य – पालकमंत्री प्रकाश आबिटकर
Total Views: 32