बातम्या

प्रा.डॉ.एम.ए. शिंदे यांच्या चार पुस्तकांचे शहाजी महाविद्यालयात  प्रकाशन

Prof Dr MA Shindes four books published at Shahaji College


By Administrator - 3/28/2026 2:47:37 PM
Share This News:



प्रा.डॉ.एम.ए. शिंदे यांच्या चार पुस्तकांचे शहाजी महाविद्यालयात  प्रकाशन

 कोल्हापूर: श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेच्या श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयातील कॉमर्स विभागातील प्रा.डॉ.एम.ए.  शिंदे यांच्या चार पुस्तकांचे प्रकाशन शनिवारी झाले.महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.के. शानेदिवाण  यांचे हस्ते व   आई क्यू ए सी समन्वयक डॉ.आर.डी.मांडणीकर  डॉ.डी.के.वळवी,डॉ.के.एम, देसाई, प्रबंधक रवींद्र भोसले, अधीक्षक मनीष भोसले यांच्या उपस्थितीत हे प्रकाशन झाले. 
 

 श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेचे चेअरमन श्री मानसिंग बोंद्रे दादा यांचे  प्रोत्साहन मिळाले. 
डॉ. शिंदे यांची ही पुस्तके शिवाजी विद्यापीठ व सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे यांच्या नवीन बदललेल्या शिक्षणक्रमानुसार, एनईपी 2020 प्रमाणे बीकॉम साठी व्यवसाय प्रशासन व्यवस्थापनाची कार्य व बीकॉम,  एम कॉम साठी ऍडव्हान्स कॉस्टिंग या विषयावरील तीन पुस्तके उपयुक्त आहेत. एम एस पब्लिकेशन मार्फत ही पुस्तके प्रकाशित करण्यात आलेली आहेत. 
   

डॉ. शिंदे यांची एकूण 11 पुस्तके प्रकाशित झाली असून गेली ते  पंचवीस वर्षे ते अध्यापन संशोधन कार्यात  आहेत. शिक्षण संशोधनाबरोबरच त्यांनी सामाजिक कार्यात कार्यात देखील जायंटस या आंतरराष्ट्रीय सेवाभावी संस्थेत ते कार्यरत आहेत. 
   

या पुस्तक प्रकाशनाबद्दल प्राचार्य डॉ.आर.के.शानेदिवाण यांनी त्यांचा गौरव केला. महाविद्यालयातील सदिच्छा समारंभात हा पुस्तक प्रकाशन सोहळा झाला. 
   

यावेळी सीए परीक्षा पास झाल्याबद्दल सुशांत संजय मयेकर यांचा गौरव करण्यात आला. 
स्वागत व प्रास्ताविक डॉ.आर.डी.मांडणीकर यांनी केले.सूत्रसंचालन डॉ.रचना माने यांनी केले. आभार डॉ.डी.पी.गावडे यांनी  मानले .यावेळी सर्व प्राध्यापक, प्रशासकीय सहकारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


प्रा.डॉ.एम.ए. शिंदे यांच्या चार पुस्तकांचे शहाजी महाविद्यालयात  प्रकाशन
Total Views: 59