बातम्या
प्रा.रामकृष्ण शेणेकर इतिहास विषयातील सेट परीक्षा उत्तीर्ण
By nisha patil - 4/9/2025 3:34:31 PM
Share This News:
प्रा.रामकृष्ण शेणेकर इतिहास विषयातील सेट परीक्षा उत्तीर्ण
कोल्हापूर: श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयातील इतिहास विभागातील प्राध्यापक रामकृष्ण सर्जेराव शेणेकर,इतिहास विषयातून महाराष्ट्र सेट परीक्षा नुकतेच उत्तीर्ण झाले.सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामार्फत घेण्यात आलेल्या सेट परीक्षेचा निकाल नुकताच लागला.
त्यात प्राध्यापक शेणेकर यांना हे यश मिळाले. श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेचे चेअरमन श्री मानसिंग बोंद्रे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. के. शानेदिवाण, इतिहास विभाग प्रमुख प्रा.सुरेश शिखरे,प्रा.शिवाजी रायजाद्ये-जाधव,प्रबंधक रवींद्र भोसले, अधीक्षक मनीष भोसले, आय क्यू ए सी समन्वयक डॉ. आर.डी.मांडणीकर यांचे त्यांना मार्गदर्शन व प्रोत्साहन मिळाले.
प्रा. रामकृष्ण शेणेकर यानी विवेकानंद कॉलेज येथून प्रथम श्रेणीत शिक्षण घेतले. सध्या ते श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयात इतिहास विभागातील प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. सेट परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
प्रा.रामकृष्ण शेणेकर इतिहास विषयातील सेट परीक्षा उत्तीर्ण
|