विशेष बातम्या
विवेकानंद कॉलेजच्या प्रा. एस. पी. थोरात यांना पी. एच. डी पदवी प्रदान
By nisha patil - 6/16/2025 3:19:08 PM
Share This News:
विवेकानंद कॉलेजच्या प्रा. एस. पी. थोरात यांना पी. एच. डी पदवी प्रदान
कोल्हापूर दि .16 : विवेकानंद कॉलेज, कोल्हापूर ( अधिकारप्रदत्त स्वायत) येथील प्रा. संजय पांडुरंग थोरात यांना शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांचेकडून नुकतीच गणित विषयात पी.एच. डी. पदवी प्रदान केली. त्यांनी ' A STUDY OF SOME GENERALIZATIONS OF LATTICES AND DISTRIBUTIVE LATTICES ' या विषयावर शोधप्रबंध सादर केला. शिवाजी विद्यापीठातील डॉ. संताजी खोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली आपले संशोधन कार्य पूर्ण केले.
प्रा. थोरात यांना डॉ.एम.टी.गोफणे, प्रा. के.डी.कुच्चे , गणित विभागप्रमुख, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर प्रा.डॉ. सरिता ठकार, माजी विभागप्रमुख व विज्ञान अधिष्ठाता, प्रा.एस.पी.पाटणकर, माजी गणित विभागप्रमुख, विवेकानंद कॉलेज, कोल्हापूर यांचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले.
श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष मा प्राचार्य अभयकुमार साळुंखे, संस्था सेक्रेटरी मा प्राचार्या सौ शुभांगी गावडे, संस्था मुख्य कार्यकारी अधिकारी मा.कौस्तुभ गावडे, विवेकानंद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ आर. आर. कुंभार, रजिस्ट्रार श्री. एस.के.धनवडे तसेच विवेकानंद कॉलेज मधील प्राध्यापक व सर्व सहकाऱ्यांनी अभिनंदन केले आहे. या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतूक होत आहे.
विवेकानंद कॉलेजच्या प्रा. एस. पी. थोरात यांना पी. एच. डी पदवी प्रदान
|