शैक्षणिक
प्रा. संदीप पाटील यांना पीएच.डी .
By nisha patil - 10/5/2025 3:52:34 PM
Share This News:
प्रा. संदीप पाटील यांना पीएच.डी .
कोल्हापूर दि.10: विवेकानंद कॉलेज कोल्हापूर ( अधिकारप्रदत्त स्वायत्त संस्था) मधील अर्थशास्त्र विभागाकडील प्राध्यापक संदीप रामगोंडा पाटील यांना शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांचे मार्फत अर्थशास्त्र विषयातील पीएच.डी.पदवी मिळाली .
प्राध्यापक संदीप पाटील यांनी " रोल ऑफ कॉमन प्रॉपर्टी रिसोर्सेस इन रुरल डेव्हलपमेंट इन कोल्हापूर डिस्ट्रिक्ट "या विषयावर संशोधन केले आहे. त्यांनी प्रा .डॉ .जे एस इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली आपले संशोधन कार्य पूर्ण केले त्यासाठी त्यांना शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर मानव्यशास्त्र विद्या शाखेचे डीन व अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ . एम एस देशमुख , सिनिअर प्रा.डॉ. पी.एस. कांबळे यांचे मार्गदर्शन लाभले संदीप पाटील यांचे श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष माननीय प्राचार्य अभयकुमार साळुंखे साहेब, सचिवा प्राचार्या सौ शुभांगी गावडे, सीईओ श्री कौस्तुभ गावडे ,महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर आर कुंभार व महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व प्रशासकीय कर्मचारी यांनी अभिनंदन केले.
प्रा. संदीप पाटील यांना पीएच.डी .
|