बातम्या

प्रा.तुषार कांबळे संख्याशास्त्र विषयातील सेट परीक्षा उत्तीर्ण

Prof Tushar Kamble passes SET exam in Statistics


By nisha patil - 3/9/2025 3:38:05 PM
Share This News:



प्रा.तुषार कांबळे संख्याशास्त्र विषयातील सेट परीक्षा उत्तीर्ण 

कोल्हापूर: श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयातील संख्याशास्त्र विभागातील प्राध्यापक तुषार शिवाजी कांबळे  संख्याशास्त्र विषयातून महाराष्ट्र सेट परीक्षा नुकतेच उत्तीर्ण झाले.सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामार्फत घेण्यात आलेल्या सेट परीक्षेचा निकाल नुकताच लागला.त्यात प्राध्यापक कांबळे यांना हे यश मिळाले.   

श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेचे चेअरमन मानसिंग बोंद्रे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. के. शानेदिवाण, प्रबंधक रवींद्र भोसले, अधीक्षक मनीष भोसले, आय क्यू ए सी समन्वयक डॉ. आर.डी.मांडणीकर  यांचे त्यांना मार्गदर्शन व प्रोत्साहन मिळाले. 
   

प्रा. तुषार कांबळे यांनी न्यू कॉलेज येथून  प्रथम श्रेणीत शिक्षण घेतले. नाईट कॉलेज कोल्हापूर येथे त्यांनी चार वर्षे काम केले. सध्या ते श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयात संख्याशास्त्र विभागातील प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. सेट परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.


प्रा.तुषार कांबळे संख्याशास्त्र विषयातील सेट परीक्षा उत्तीर्ण
Total Views: 77