बातम्या
प्रा. विनायक पाटील यांना पीएच.डी जाहीर
By nisha patil - 10/14/2025 3:49:10 PM
Share This News:
प्रा. विनायक पाटील यांना पीएच.डी जाहीर
कोल्हापूर : दसरा चौक येथील श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयाच्या कनिष्ठ विभागातील डॉ. प्रा. विनायक आनंदराव पाटील यांना नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाची वाणिज्य विषयातून पीएचडी पदवी प्राप्त झाली.
त्यांनी "अ स्टडी ऑन कस्टमर सॅटीस्फॅक्शन ऑफ प्रॉडक्ट अँड सर्विसेस ऑफ इंडियन पोस्ट ऑफिस विथ स्पेशल रेफरन्स टू कोल्हापूर डिस्ट्रिक्ट" विषयावर शोध प्रबंध सादर केला. त्यांना डॉ. प्रा. गणेश बोकारे यांच्या मार्गदर्शनाखाली शोध प्रबंध सादर केला. त्यांना शाहू शिक्षण संस्थेचे चेअरमन मानसिंग बोंद्रे (दादा), प्राचार्य डॉ. आर. के .शानेदिवाण यांचे मार्गदर्शन लाभले.
प्रा. विनायक पाटील यांना पीएच.डी जाहीर
|