बातम्या
शहाजी महाविद्यालयामध्ये 'प्राध्यापक प्रबोधिनी विचार मंच' चे उद्घाटन
By nisha patil - 7/28/2025 6:50:43 PM
Share This News:
शहाजी महाविद्यालयामध्ये 'प्राध्यापक प्रबोधिनी विचार मंच' चे उद्घाटन
कोल्हापूर:श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयामध्ये 'प्राध्यापक प्रबोधिनी विचार मंच' चे उद्घाटनप्रसंगी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची उपस्थिती: सद्यस्थिती, कारणे आणि उपाय या विषयावर विचार मंथन करण्यासाठी चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर.के.शानेदिवाण होते.
कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक प्राध्यापक प्रबोधिनी विचार मंचचे समन्वयक डॉ. डी एल काशिद- पाटील यांनी केले. प्रस्ताविकामध्ये त्यांनी प्राध्यापक प्रबोधिनी विचार मंच त्याची उद्दिष्टे, महत्व ,कार्यपद्धती स्पष्ट केली. या चर्चासत्रामध्ये महाविद्यालयातील डॉ. के एम देसाई,डॉ. डी के वळवी, प्रा. पी के पाटील, डॉ रचना माने, डॉ. एस डी रायजादे, प्रा. संतोष कांबळे, प्रा. अर्जुन कांबळे, प्रा. मनोजकुमार कांबळे, डॉ. सुरेश शिखरे, डॉ. पी बी पाटील, आयक्यूएसी सहसमन्वयक डॉ. ए बी बलगुडे, प्रबंधक श्री रविंद्र भोसले यांनी विद्यार्थ्यांच्या उपस्थितीबाबतचे कारणे आणि उपाय व्यक्त केले.
अध्यक्षीय मनोगतामध्ये महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर के शानेदिवाण यांनी विशेष मार्गदर्शन केले. महाविद्यालयातील नवोपक्रम, महाविद्यालयातील परीक्षा पद्धती, विद्यार्थी- पालक- प्राध्यापक सुसंवाद, विविध कार्यक्रमातील विद्यार्थ्यांचा सहभाग यामुळे उपस्थिती वाढत असल्याचे त्यांनी मत व्यक्त केले.
या कार्यक्रमाला संस्थेचे चेअरमन तथा व्हाईस चीफपेट्रन मा.मानसिंग (दादा) बोंद्रे यांची प्रेरणा मिळाली.
आयक्यूएसी समन्वयक डॉ आर डी मांडणीकर,अधीक्षक एम व्ही भोसले उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. शुभम पाटील यांनी केले. तर आभार प्रा. सौ. एस. के. भोसले यांनी मानले. याप्रसंगी प्राध्यापक,शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शहाजी महाविद्यालयामध्ये 'प्राध्यापक प्रबोधिनी विचार मंच' चे उद्घाटन
|