बातम्या

मोफत आरोग्य शिबिरातून नागरिकांच्या आरोग्य संवर्धनाला चालना

Promoting health promotion of citizens through free health camps


By nisha patil - 9/26/2025 4:38:52 PM
Share This News:



मोफत आरोग्य शिबिरातून नागरिकांच्या आरोग्य संवर्धनाला चालना 

इचलकरंजी, दि. 25 : पंतप्रधान नरेंद्रजी मोदी व आमदार डॉ. राहुल आवाडे यांच्या वाढदिवसानिमित्त, पश्चिम मंडल वैद्यकीय आघाडीचे अध्यक्ष डॉ. पांडुरंग पिळणकर व माजी नगरसेवक मनोज हिंगमिरे यांच्या वतीने दत्त मंदिर, भारतमाता हौसिंग सोसायटी, इचलकरंजी येथे मोफत आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले.

या उपक्रमाचे उद्घाटन आमदार डॉ. राहुल आवाडे यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.

शिबिरादरम्यान उपस्थित नागरिकांची विविध आरोग्य तपासण्या, तज्ज्ञांचा सल्ला व आवश्यक मार्गदर्शन देण्यात आले. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्य संवर्धनात मोठा हातभार लागला.

कार्यक्रमाला उपस्थित राहिलेल्या नागरिकांनी या उपक्रमाचे मनापासून कौतुक केले. तसेच भविष्यातही सामाजिक व आरोग्यविषयक उपक्रम सातत्याने राबवावेत अशी अपेक्षा व्यक्त केली.


मोफत आरोग्य शिबिरातून नागरिकांच्या आरोग्य संवर्धनाला चालना
Total Views: 61