बातम्या
“प्रभावी शिक्षणासाठी ए.आय. तंत्रज्ञानाचा योग्य वापर आवश्यक” — डॉ. सचिन पाटील; विवेकानंद महाविद्यालयात कार्यशाळा संपन्न
By nisha patil - 11/22/2025 3:42:08 PM
Share This News:
“प्रभावी शिक्षणासाठी ए.आय. तंत्रज्ञानाचा योग्य वापर आवश्यक” — डॉ. सचिन पाटील; विवेकानंद महाविद्यालयात कार्यशाळा संपन्न
विवेकानंद महाविद्यालयाच्या संगणकशास्त्र विभागातर्फे अग्रणी महाविद्यालय योजना (न्यू कॉलेज क्लस्टर) अंतर्गत आयोजित ‘AI Powered Teaching & Learning : Aligning with NEP 2020’ या कार्यशाळेत प्रमुख वक्ते म्हणून बोलताना इस्लामपूर येथील राजारामबापू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे संगणकशास्त्र विभागप्रमुख डॉ. सचिन पाटील यांनी प्रभावी शिक्षणासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाचा योग्य वापर आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार Blended Teaching & Learning, Flipped Classroom यांसारख्या आधुनिक शैक्षणिक संकल्पनांची गरज वाढत असून, शिक्षक व विद्यार्थी यांनी काळानुरूप AI-आधारित शिक्षणपद्धती आत्मसात करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. एस. पी. थोरात होते. दुपारच्या सत्रात सायबर कॉलेजच्या डॉ. रजनी कामत यांनी E-Learning या विषयावर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाची सुरुवात संस्था प्रार्थना व रोपाला पाणी घालून झाली. प्रास्ताविक व स्वागत कार्यशाळा समन्वयक प्रा. डॉ. इरफान मुजावर यांनी केले तर आभार संगणकशास्त्र विभागप्रमुख डॉ. विशाल वाघमारे यांनी मानले. या कार्यशाळेस न्यू कॉलेज क्लस्टरमधील महाविद्यालयांतील प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्र. प्राचार्य डॉ. थोरात, IQAC समन्वयक डॉ. श्रुती जोशी, डॉ. राजश्री पाटील, प्रा. महेश पाटील, प्रा. शुभांगी बैस, प्रा. सोनल औंधकर, प्रा. निकिता हुडे, प्रा. मनिषा दबडे तसेच रजिस्ट्रार एस. के. धनवडे यांचे सहकार्य लाभल्याने कार्यक्रम यशस्वी झाला.
“प्रभावी शिक्षणासाठी ए.आय. तंत्रज्ञानाचा योग्य वापर आवश्यक” — डॉ. सचिन पाटील; विवेकानंद महाविद्यालयात कार्यशाळा संपन्न
|