ताज्या बातम्या
कोल्हापूर कारागृहात आंतरराष्ट्रीय मानवी हक्क दिवस साजरा
By nisha patil - 11/12/2025 10:47:31 AM
Share This News:
कोल्हापूर जिल्हा कारागृहात 10 डिसेंबर, 2025 रोजी आंतरराष्ट्रीय मानवी हक्क दिवस साजरा करण्यात आला. महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोग, महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कोल्हापूर व जिल्हा कारागृह यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित केला गेला.
कार्यक्रमात बंद्यांना मानवी हक्कांचे संरक्षण, तक्रारींचे मार्गदर्शन, ऐतिहासिक माहिती आणि भारतीय संविधानात मानवी हक्कांचा समावेश याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. उपस्थित मान्यवरांमध्ये मुख्य न्यायमूर्तींच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस महासंचालक डॉ. सुहास वारके, विशेष कारागृह महानिरीक्षक योगेश देसाई, पश्चिम विभाग उपमहानिरीक्षक सुनील ढमाळ यांचा समावेश होता.
कार्यक्रमाची सुरुवात अधीक्षक चंद्रकांत जठार यांनी स्वागताने केली, तर विधिज्ञ ॲड. ए.आर. कुलकर्णी यांनी बंद्यांना मानवी हक्कांचे सविस्तर मार्गदर्शन केले. याशिवाय प्रमुख पाहूण मा.ॲड आशिष देसाई व मा.ॲड सुरज पाटील यांनीही मानवी हक्काचे महत्व स्पष्ट केले.
कोल्हापूर कारागृहात आंतरराष्ट्रीय मानवी हक्क दिवस साजरा
|