बातम्या

हॉकी स्टेडियम चौकातील खड्डे आणि अपघातांच्या धोक्याविरोधात आंदोलन; कायमस्वरूपी दुरुस्तीची मागणी

Protest against potholes and accident risks


By nisha patil - 11/10/2026 7:24:02 PM
Share This News:



हॉकी स्टेडियम चौकातील खड्डे आणि अपघातांच्या धोक्याविरोधात आंदोलन; कायमस्वरूपी दुरुस्तीची मागणी

कोल्हापूर : शहरातील अत्यंत वर्दळीचा असलेल्या हॉकी स्टेडियम चौकातील रस्त्याची दुरवस्था झाली असून, मोठमोठ्या खड्ड्यांमुळे वाहनधारक व नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. या गंभीर समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी स्थानिक नागरिकांच्या वतीने आंदोलन करण्यात येणार आहे.

संभाजीनगर एसटी आगाराकडे जाणाऱ्या एसटी बसेस याच चौकातून जातात. आर. के. नगर, कळंबा, पाचगाव या उपनगरांना शिवाजी पेठ, मंगळवार पेठ आणि शहरातील अन्य भागांशी जोडणारा हा प्रमुख मार्ग असल्याने येथे एसटी, केएमटी तसेच अवजड वाहनांची मोठी वर्दळ असते. मात्र, एवढी वाहतूक असूनही चौकात आवश्यक वाहतूक सुरक्षेच्या उपाययोजनांचा अभाव आहे.

दरवर्षी पावसाळ्यात रस्त्याची तात्पुरती दुरुस्ती केली जाते. मागील वर्षी नव्याने करण्यात आलेला रस्ताही एका पावसात खराब झाल्याने कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. खड्ड्यांमध्ये पाणी साचल्यामुळे वाहनधारकांना खड्ड्यांच्या खोलीचा अंदाज येत नाही. त्यामुळे अपघातांचा धोका वाढला आहे.

या समस्येबाबत यापूर्वीही नागरिकांनी आंदोलने केली असून, प्रशासनाकडून कायमस्वरूपी उपाययोजना झालेली नसल्याची नागरिकांची तक्रार आहे.

रस्त्याची कायमस्वरूपी दुरुस्ती करावी, खड्डे बुजवावेत, वाहतूक सिग्नल व झेब्रा क्रॉसिंगची व्यवस्था करावी आणि आवश्यक त्या ठिकाणी गतिरोधक बसवावेत, अशी मागणी आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.

प्रशासनाने या समस्येची तातडीने दखल घेऊन नागरिकांना सुरक्षित वाहतुकीची सुविधा उपलब्ध करून द्यावी. अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा नागरिकांच्या वतीने देण्यात येणार आहे.
आज दिनांक ११/१०/२०२० सायंकाळी ४:३० आपली स्टेडियम चौक
येथे यावे ही विनंती


हॉकी स्टेडियम चौकातील खड्डे आणि अपघातांच्या धोक्याविरोधात आंदोलन; कायमस्वरूपी दुरुस्तीची मागणी
Total Views: 19