बातम्या
भगवान पार्श्वनाथ जैन मंदिराच्या पाडकामाचा निषेध
By nisha patil - 4/24/2025 6:06:45 PM
Share This News:
भगवान पार्श्वनाथ जैन मंदिराच्या पाडकामाचा निषेध
सकल जैन समाजाचं जनआक्रोश मोर्चाचं आयोजन
दसरा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा
विले पार्ले मुंबईतील भगवान पार्श्वनाथ जैन मंदिराच्या पाडकामाच्या निषेधार्थ सकल जैन समाजाच्या वतीने शुक्रवार २५ एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. मुंबईतील विले पार्ले भागात भगवान पार्श्वनाथ जैन मंदिर पाडण्यात आले, ही घटना समाजाच्या धार्मिक भावना दुखावणारी आहे. या अन्यायी प्रकाराचा निषेध करण्यासाठी कोल्हापुरात मोर्चाचे आयोजन करण्यात आलं आहे.
हा मोर्चा शुक्रवार, २५ एप्रिलला सकाळी ९ वाजता दसरा चौक येथून सुरू होणार असून, शहरातील प्रमुख मार्गांवरून मार्गक्रमण करत जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचणार आहे. संयोजकांच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे की, जैन समाजातील सर्व सदस्यांनी आपल्या कुटुंबासह या मोर्चात सक्रिय सहभागी व्हावे आणि शांततेच्या मार्गाने आपला तीव्र निषेध नोंदवावा असे आवाहन केले आहे.
भगवान पार्श्वनाथ जैन मंदिराच्या पाडकामाचा निषेध
|