बातम्या

दारात धूळ फेकून महापालिकेचा निषेध

Protest against the municipal corporation by throwing dust at the door


By nisha patil - 10/10/2025 4:56:28 PM
Share This News:



दारात धूळ फेकून महापालिकेचा निषेध

धुळ प्रश्नावर आप चे धूळ फेक आंदोलन...

शहरभर पडलेल्या खड्ड्यांमुळे हवेत धुळीचे साम्राज्य पसरले आहे. याचा फटका नागरिकांना बसत आहे नाका तांबात धूळ जाऊन नागरिक आजारी पडत आहेत, धुळीच्या त्रासाने वाहनचालकांना तोंडाला मास्क बांधून फिरायची वेळ आली आहे.

यात्रा विरोध म्हणून रस्त्यावर पसरलेली धूळ माती महापालिकेच्या दारात धूळ होतं आपने धूळ फेक आंदोलन केलं

पावसाळ्यात मुरूम टाकून केलेली तात्पुरती डागडुजी, पावसाने बाहून आलेली माती, काहीच दिवनात उखडलेले पॅचवर्क यामुळे यामुळे हवेतील धुळीचे प्रमाण वाढले आहे.

केंद्राच्या राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमातून गेल्या दोन वर्षात अठरा कोटी रुपये खर्च झाले. एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी खर्च करून सुद्धा शहरातील धुळीचा प्रश्न गंभीर होत आहे. चौका-चौकात लावलेले  मिस्ट टॉवर बंद आहेत, हवेतील धुलिकण कमी करण्यासाठी महापालिकेने मिस्ट स्प्रेविंग मशीन घेतले आहे, ते नेमके कुठे वापरले जाते याचे उत्तर अधिकारी देतील का असा प्रश्न आप चे प्रदेश संघटन सचिव संदीप देसाई यांनी केला.

यावेळी शहराध्यक्ष उत्तम पाटील, सूरज सुर्वे, अभिजित कांबळे, मोईन मोकाशी, समीर लतीफ, दुष्यंत माने, विजय हेगडे, प्रसाद सुतार, अनिल जाधव, राकेश गायकवाड, संजय नलवडे, रणजित पाटील, अमरसिंह दळवी, महमदशरीफ काझी, शशांक लोखंडे, प्रथमेश सूर्यवंशी आदी उपस्थित होते


दारात धूळ फेकून महापालिकेचा निषेध
Total Views: 77