ताज्या बातम्या
इस्लामपूरात अण्णाभाऊ साठे पुतळ्यासाठी टक्कर मोर्चा – तिघा तरुणांचे रक्त सांडून निषेध
By nisha patil - 7/8/2025 5:05:25 PM
Share This News:
इस्लामपूरात अण्णाभाऊ साठे पुतळ्यासाठी टक्कर मोर्चा – तिघा तरुणांचे रक्त सांडून निषेध
प्रतिनिधी किशोर जासूद इस्लामपूर (जि. सांगली) येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासाठी बुधवारी टक्कर मोर्चा आंदोलन छेडण्यात आले. वाळवा पंचायत समितीपासून सुरुवात झालेल्या मोर्च्याचे तहसील कार्यालयासमोर रूपांतर तीव्र आंदोलनात झाले.
या आंदोलनात संतप्त तरुणांनी प्रशासनाच्या उदासीनतेविरोधात आपले डोके भिंतीवर आपटून रक्त सांडले, त्यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला. पोलिसांनी जखमींना तत्काळ रुग्णालयात हलवले.
कार्यकर्त्यांनी जाहीर इशारा दिला की, "आम्ही आमचे रक्त सांडले, आता पुतळा बसला नाही तर फास लावून घेऊ." पुतळा हटवू नये म्हणून कार्यकर्ते २४ तास पहारा देत आहेत.
आंदोलकांची प्रमुख मागणी – तहसील चौकात कायमस्वरूपी पूर्णाकृती पुतळा बसवण्यात यावा, आणि साठे स्मारकासाठी प्रशासनाने ठोस निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
इस्लामपूरात अण्णाभाऊ साठे पुतळ्यासाठी टक्कर मोर्चा – तिघा तरुणांचे रक्त सांडून निषेध
|