विशेष बातम्या
भिडे गुरुजींच्या समर्थनार्थ कोल्हापुरात धारकऱ्यांचा निषेध मोर्चा
By nisha patil - 5/26/2025 4:48:23 PM
Share This News:
भिडे गुरुजींच्या समर्थनार्थ कोल्हापुरात धारकऱ्यांचा निषेध मोर्चा
दिलीप सावंतवर कडक कारवाईची मागणी, पोलिसांना निवेदन सादर
पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तिथीनुसार राजाभिषेक दिन साजरा करण्याच्या मुद्द्यावरून भिडे गुरुजींवर एक खाजगी चॅनेलवर झालेल्या चर्चेत दिलीप सावंत याने वापरलेल्या अपमानास्पद भाषेचा निषेध करण्यासाठी रविवारी धारकऱ्यांनी कोल्हापुरातील शिवाजी पेठेत सावंतच्या घरी धाव घेतली. मात्र तो राजवाडा पोलीस ठाण्यात गेलेला असल्याने धारकऱ्यांनी तिथेच जाऊन तक्रार दाखल केली.
सोमवारी सकाळी शिवाजी महाराज चौकात शंभरावर धारकरी एकत्र आले. तेथून लक्ष्मीपुरी पोलीस स्टेशन तसेच कोल्हापूरचे एसपी गुप्ता यांच्याकडे निवेदन सादर करत दिलीप सावंतवर कडक कारवाईची मागणी केली. भिडे गुरुजींविरोधात भविष्यात अपमानास्पद वक्तव्य करणाऱ्यांना "धारकरी हिसका दाखवतील" असा इशाराही यावेळी देण्यात आला.
कार्यक्रमात श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान व हिंदू एकता आंदोलनचे पaदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
भिडे गुरुजींच्या समर्थनार्थ कोल्हापुरात धारकऱ्यांचा निषेध मोर्चा
|