बातम्या
मदरसा व समता कॉलनीत प्राथमिक सुविधा द्या.-सामाजिक कार्यकर्ते याहिया बुडडेखान यांची मागणी
By Administrator - 9/3/2026 5:20:32 PM
Share This News:
मदरसा व समता कॉलनीत प्राथमिक सुविधा द्या.-सामाजिक कार्यकर्ते याहिया बुडडेखान यांची मागणी
आजरा(हसन तकीलदार):-आजरा नगरपंचायतीची निवडणूक होऊन खाते वाटप झाले तरी सुद्धा अजून म्हणावे तितकी कारभारात प्रगती दिसून येत नाही. कचरा उठावाचा तर पुरता फज्जा उडाला आहे. जवळ जवळ महिना दीड महिना होऊन गेला तरी कचरा उठवाबाबत ठोस निर्णय घेता आलेला नाही. विरोधक सोशल मीडियातून आपली नाराजी व्यक्त करताना दिसत आहेत तर सत्ताधारी नियोजन करीत आहोत असे उत्तर देताना दिसत आहेत.
केवळ पाच सफाई कामगार असल्यामुळे गटारी काढणे, कचरा उचल करणे यासारखी संपूर्ण शहरात व उपनगरात कामे करताना मर्यादा स्पष्ट होत आहेत. मदरसा कॉलनी आणि पोलीस स्टेशनच्या बरोबर समोर आजरा आंबोली महामार्गावर कचऱ्याचा ढीग लागला आहे. तर मदरसा कॉलनीतील गटारीमधील घाण काढून रस्त्यावर टाकण्यात आला आहे. जवळ जवळ पंधरा ते विस दिवस झाले तरी ती घाण तशीच पडून आहे.
कोंबड्यानी ती घाण परत गटारीत विसकटली आहे. त्यामुळे गटारी तुडुंब होऊन डासांची वाढ होत आहे. यामुळे येथील लोकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. असे सामाजिक कार्यकर्ते याहिया बुडडेखान यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.
जवळपास 32वर्षांपासून रडखडलेला समता आणि मदरसा कॉलनीतील रस्ता त्यावेळी तत्कालीन गृहमंत्री नाम. सतेज पाटील यांच्या प्रयत्नातून मिळाला आणि त्यांच्याच आमदार फंडातून 2018 साली रस्त्याचे खडीकरण करण्यात आले. तेव्हापासून आजपर्यंत या रस्त्याला निधी आलेला असताना सुद्धा रस्ता केलेला नाही. त्याचप्रमाणे या रस्त्यावर वाहने आडवी तिडवी लावत असलेने रहदारीला अडचण होत असल्याचा आरोप बुडडेखान यांनी केला आहे.
विद्यमान नगरसेविकेने याकडे लक्ष देऊन लवकरात लवकर कचरा उठाव, रस्ता तसेच इतर मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्यावेत अशी मागणी केली आहे. जवळपास आजरा शहरातील आणि उपनगरातील रस्त्यांची कामे सुरु झालेली आहेत परंतु मदरसा व समता कॉलनी यापासून वंचित आहे.
लवकरात लवकर मूलभूत सुविधा पूर्ण करा नाहीतर आम्ही सर्वजण नगरपंचायतिवर मोर्चा काढणार असा इशारा करिम कांडगावकर यांनी दिला आहे. यावेळी अझरुद्दीन नेसरीकर, महंमद नेसरीकर, मेहफुज दरवाजकर, फारुख बागबान, जावेद दरवाजकर, रहिमबक्ष नेसरीकर, अबूतलहा शेख, इलियास लमतुरे, सईद माणगावकर तसेच मदरसा कॉलनीतील नागरिक उपस्थित होते.
आमच्या चॅनेलचे प्रतिनिधी सदर कचऱ्याचे चित्रकरण करून मुलाखत घेत असलेबद्दल कळताच तातडीने पोलीस स्टेशन समोरील कचरा उठाव करण्यात आला
मदरसा व समता कॉलनीत प्राथमिक सुविधा द्या.-सामाजिक कार्यकर्ते याहिया बुडडेखान यांची मागणी
|