राजकीय
कारखान्याच्या सर्व सभासदांना सरसकट सवलतीच्या दरातील साखर द्या -संजय पाटील
By nisha patil - 4/23/2026 12:31:30 PM
Share This News:
कारखान्याच्या सर्व सभासदांना सरसकट सवलतीच्या दरातील साखर द्या -संजय पाटील
(हसन तकीलदार):- सद्या आजरा साखर कारखान्याकडून 16 एप्रिल ते 15 मे 2026 दरम्यान सवलतीच्या दरात साखर वितरण सुरु आहे. कारखान्याकडे 15,000/-₹शेअर्स रक्कम असलेल्या 'अ' व 'ब' वर्ग सभासदांना प्रत्येकी 50 किलो, 10,000₹ असलेल्या सभासदांना 25 किलो आणि 7,000/-शेअर्स रसलेल्या सभासदांना 15 किलो साखर तसेच गळीत हंगाम सन 2025-26 मध्ये ऊस पुरवठा केलेल्या ऊस उत्पादकांना प्रतिटन अर्धाकिलो साखर प्रतिकिलो 25/-₹सवलतीच्या दरात देण्यात येत आहे. परंतु पाच ते सहा हजार शेअर्स रक्कम असणारे 'अ ' व 'ब' वर्ग सभासद यापासून वंचित राहणार आहेत. त्यामुळे कारखान्याच्या सर्व सभासदांना सरसकट सवलतीच्या दरात साखर देण्याची मागणी शिवसेना आजरा शिंदे गटाकडून करण्यात आली असून याबाबतचे निवेदन आजरा साखर कारखान्याच्या कार्यकारी संचालक यांना देण्यात आले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, पाच ते सहा हजार शेअर्स रक्कम असणारे 'अ' व 'ब' सभासद स्थापनेपासूनचे 17,408 इतके आहेत. त्याचबरोबर 5000 च्या आतील शेअर्स रक्कम असणारे सभासद संख्या 6,581 तर 6,000 ते 7,000 शेअर्स रक्कम असणारी सभासद संख्या 1,344 इतकी आहे. म्हणजेच 25,338 इतक्या सभासदांना आपल्याकडून सवलतीच्या दरातील साखर दिली जात नाही. वरील सर्व सभासदांपैकी म्हणजेच 95% सभासद हे स्थापनेपासूनच सभासद असून आपण त्यांच्यावर साखर न देऊन अन्याय करत आहात. सदरचे सभासद हे आपल्याला मतदानाला, वार्षिक सर्वसाधारण सभेला चालतात, त्यांनी पिकवलेला ऊस आपल्या कारखान्याच्या गळीतासाठी चालतो मग त्यांना सवलातीच्या दरातील साखर का दिली जात नाही? वरील सर्व सभासदांना 15, 25, 50 किलो सवलतीच्या दरात साखर न देता सरसकट धोरण ठरवून 50 किलो सरसकट सवलतीच्या दरात सर्व सभासदांना द्यावी अन्यथा न्याय मागण्यासाठी लोकशाही मार्गाबरोबरच कायदेशीर मार्गाचा अवलंब केला जाईल असा इशाराही देण्यात आला आहे. हे निवेदन कार्यकारी संचालक यांच्या बरोबर साखर संचालक, कोल्हापूर व पालकमंत्री नाम. प्रकश आबिटकर यांनाही देण्यात आले आहेत. यावेळी संजय पाटील, राजेंद्र सावंत, काकासो देसाई, संतोष भाटले (कार्यालय प्रमुख), दयानंद निऊंगरे, सुधीर जाधव आदिजण उपस्थित होते.
कारखान्याच्या सर्व सभासदांना सरसकट सवलतीच्या दरातील साखर द्या -संजय पाटील
|