बातम्या
सेवानिवृत्त प्राध्यापकांचा प्राव्हीडंट फंड विलंबित; व्याजाची मागणी
By nisha patil - 11/19/2025 5:41:31 PM
Share This News:
सेवानिवृत्त प्राध्यापकांचा प्राव्हीडंट फंड विलंबित; व्याजाची मागणी
सुटा कार्यालयात गुरुवारी बैठक; प्राध्यापकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन
कोल्हापूर :महाविद्यालयीन व विद्यापीठीय सेवानिवृत्त शिक्षक असोसिएशन, कोल्हापूर (सुटा संलग्न) ने सेवानिवृत्त प्राध्यापकांच्या प्राव्हीडंट फंडाच्या विलंबित रकमेवर व्याज देण्याची मागणी केली आहे. विभागीय शिक्षण सहसंचालक कार्यालयाकडून प्राव्हीडंट फंडाची रक्कम ४ ते १२ महिन्यांपर्यंत विलंबित होत असल्याचे संघटनेने नमूद केले आहे.
सुटा कार्यालयात गुरुवार, २० नोव्हेंबर २०२५, दुपारी ३.०० वाजता बैठक आयोजित करण्यात आली असून, सर्व संबंधित प्राध्यापकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन कार्यवाह प्रा. डॉ. एस. ए. बोजगर यांनी केले आहे. संघटनेने या बैठकीत विलंब कालावधीस व्याज मिळावे, तसेच शासन नियमांचे पालन सुनिश्चित करावे, यासाठी चर्चा होईल असे सांगितले आहे.
सेवानिवृत्त प्राध्यापकांचा प्राव्हीडंट फंड विलंबित; व्याजाची मागणी
|