आरोग्य

महाबळेश्वर, वाई व खंडाळा तालुक्यातील आरोग्य सुविधा बळकट करण्याचे सार्वजनिक आरोग्यमंत्र्यांचे निर्देश

Public Health Minister directs to strengthen health facilities in Mahabaleshwar Wai and Khandala talukas

By nisha patil - 7/5/2026 12:35:31 PM
Share This News:

महाबळेश्वर, वाई व खंडाळा तालुक्यातील आरोग्य सुविधा बळकट करण्याचे सार्वजनिक आरोग्यमंत्र्यांचे निर्देश

महाबळेश्वर ग्रामीण रुग्णालयाचे श्रेणीवर्धन होणार. महाबळेश्वर, वाई आणि खंडाळा तालुक्यातील सार्वजनिक आरोग्य सेवांचा सविस्तर आढावा सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईतील आरोग्य सेवा आयुक्तालय येथे घेण्यात आला.

या बैठकीत मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांच्या सह सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. निपुण विनायक, आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, शहरी अभियान आयुक्त सुनील भोकरे तसेच आरोग्य संचालक डॉ. विजय कंदेवाड,  पुणे परिमंडळाचे आरोग्य उपसंचालक डॉ. भगवान पवार उपस्थित होते.

महाबळेश्वर, वाई व खंडाळा तालुक्यातील आरोग्य सुविधा बळकट करण्याचे सार्वजनिक आरोग्यमंत्र्यांचे निर्देश
Total Views: 3