राजकीय

पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांचा जिल्हा दौरा

Public Health and Family Welfare Minister and Guardian Minister Prakash Abitkar on a district tour


By nisha patil - 4/5/2026 1:18:21 PM
Share This News:



पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांचा जिल्हा दौरा

 

सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर जिल्हा दौऱ्यावर असून त्यांचा दौरा पुढीलप्रमाणे - सोमवार, दि. 4 मे रोजी दुपारी 3 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे आगमन व सह्याद्री व्याघ्र प्रकल्प विभागाचा कोल्हापूर जिल्ह्यातील कामकाजाचा आढावा बैठकीस उपस्थिती.

 

दुपारी 3.30 वाजता अन्न व औषध प्रशासन विभाग व उपनियंत्रक वैधमापन शास्त्र विभाग यांच्या कामकाजाचा आढावा. दुपारी 4 वाजता राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय, कोल्हापूर कामकाजाचा आढावा. दुपारी 4.30 वाजता कोल्हापूर जिल्ह्यातील मंडळ अधिकारी व ग्राम महसूल अधिकारी यांना नवीन लॅपटॉप वितरण समारंभास उपस्थिती. (स्थळ: महाराणी ताराराणी सभागृह) सायं. 5 वाजता जिल्हा नियोजन समिती निधी सन 2025-26 मधून आरोग्य विभाग, जिल्हा परिषद कोल्हापूर करिता खरेदी केलेल्या नवीन पाच रुग्णवाहिकांच्या लोकार्पण कार्यक्रमास उपस्थिती. (स्थळ: जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर) सोयीनुसार शासकीय विश्रामगृह कोल्हापूर येथे आगमन व राखीव. रात्री 8.30 वाजता शासकीय विश्रामगृह येथून छत्रपती शाहू महाराज टर्मिनसकडे प्रयाण. रात्री 8.40 वाजता छत्रपती शाहू महाराज टर्मिनस येथे आगमन. रात्री 8.50 वाजता महालक्ष्मी एक्सप्रेसने मुंबईकडे प्रयाण.


पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांचा जिल्हा दौरा
Total Views: 3