बातम्या

लोकसेवा आयोगाच्या ऑनलाईन भरतीत तृतीयपंथीयांसाठी पर्याय खुला

Public Service Commission opens options


By nisha patil - 8/27/2025 4:06:08 PM
Share This News:



लोकसेवा आयोगाच्या ऑनलाईन भरतीत तृतीयपंथीयांसाठी पर्याय खुला

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेतल्या जाणाऱ्या विविध पदांच्या भरती प्रक्रियेत तृतीयपंथीयांसाठी स्वतंत्र विभाग तयार करण्यात आला होता. मात्र तांत्रिक बिघाडामुळे त्यांचे अर्ज ऑनलाईन स्वीकारले जात नव्हते. या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये याचिका दाखल होताच आयोगाने तत्काळ सुधारणा केली.

न्यायमूर्तींनी आयोगाला “पुढील काळात कोणतीही जाहिरात प्रसिद्ध करताना तांत्रिक बाबींची योग्य खबरदारी घेऊन तृतीयपंथीयांसाठी पर्याय खुला ठेवावा” असे निर्देश दिले.

तृतीयपंथी हक्क संरक्षण व कल्याण मंडळाच्या सहअध्यक्ष शिवानी गजबर यांनी मे २०२५ मध्ये आयोगाच्या सचिव सुवर्णा खरात यांची भेट घेऊन तक्रार केली होती. मात्र, सुधारणा न झाल्याने अखेर त्यांनी न्यायालयात धाव घेतली. त्यानंतर आयोगाने ऑनलाईन अर्ज प्रक्रियेत सुधारणा करत गजबर यांचा अर्ज स्वीकारला.

या याचिकेवर अॅड. अमित साळी यांनी गजबर यांची बाजू मांडली, तर अॅड. जयेश उमेशचंद्र मोरे यांनी सहकार्य केले.


लोकसेवा आयोगाच्या ऑनलाईन भरतीत तृतीयपंथीयांसाठी पर्याय खुला
Total Views: 75