बातम्या

राष्ट्रीय वन्यजीव सप्ताहांतर्गत  विवेकानंद महाविद्यालयात जनजागृती रॅली

Public awareness rally


By nisha patil - 5/10/2026 11:33:19 PM
Share This News:



राष्ट्रीय वन्यजीव सप्ताहांतर्गत  विवेकानंद महाविद्यालयात जनजागृती रॅली

कोल्हापूर दि.05 : राष्ट्रीय वन्यजीव  सप्ताहाच्या निमित्ताने विवेकानंद महाविद्यालयातील प्राणीशास्त्र विभाग व IQAC  यांच्या वतीने वन्यजीव संरक्षणाबाबत जनजागृती करण्यासाठी रॅलीचे आयोजन करण्यात आले. महाविद्यालयातील बी.एस्सी., एम.एस्सी. एन.एस.एस. व एन.सी.सी. च्या विद्यार्थ्यांनी तसेच प्राध्यापकांनी रॅलीमध्ये सहभाग नोंदवला.

रॅली दरम्यान विद्यार्थ्यांनी  वन्यजीव वाचवा, पर्यावरण वाचवा व वन्यजीव संरक्षण हीच काळाची गरज अशा घोषणांनी नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. यावेळी विविध फलक व पोस्टर्सच्या माध्यमातून वन्यजीवांचे महत्व्‍ा , जंगलांचे संवर्धन यासाठी संदेश दिला.

 ही रॅली विवेकानंद कॉलेज ते मध्यवर्ती बस स्थानक या मार्गे काढण्यात आली.  रॅलीला स्थानिक नागरिकांचा पाठिंबा मिळाला.  डॉ. टी. सी. गौपाले यांच्या मार्गदर्शनाखाली या रॅलीचे आयोजन करण्यात आले.

या रॅलीसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मिलिंद हुजरे, डॉ. सी. बी. पाटील, डॉ. जी.के. सोनटक्के, रजिस्ट्रार श्री एस. के. धनवडे यांचे मार्गदर्शन मिळाले.  यावेळी एन.एस.एस.प्रमुख डॉ.संदीप पाटील, एन.सी.सी. मुली प्रमुख प्रा.डॉ. नम्रता नरेवाडीकर व विभागातील प्राध्यापक, विद्यार्थी, विद्यार्थिनी रॅलीत सहभागी झाले होते.


राष्ट्रीय वन्यजीव सप्ताहांतर्गत  विवेकानंद महाविद्यालयात जनजागृती रॅली
Total Views: 15