बातम्या
दहशतवादी हल्ल्याचा सकल हिंदू समाजाकडून जाहीर निषेध
By nisha patil - 4/28/2025 1:30:53 PM
Share This News:
दहशतवादी हल्ल्याचा सकल हिंदू समाजाकडून जाहीर निषेध
पाकिस्तानचा झेंडा पायदळी तुडवत महिलांच्या उपस्थितीत निषेध आंदोलन
काल दिनांक २७ एप्रिल २०२५ रोजी संध्याकाळी ५ वाजता, शिवतीर्थावर छत्रपती शिवाजी महाराज चौकात अखिल भारत हिंदू महासभा जिल्हा कार्यालयाच्या वतीने जम्मू-कश्मीरच्या पहलगाममध्ये हिंदूंवर झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याचा सकल हिंदू समाजाच्या वतीने महिलांच्या उपस्थितीत जाहीर निषेध आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनात पाकिस्तानचा राष्ट्रध्वज रस्त्यावर अंथरून महिलांनी चपलांनी तुडवत अभिनव निषेध व्यक्त केला. "वंदे मातरम" व "भारत माता की जय"च्या घोषणांनी परिसर दुमदुमला. पाकिस्तानचा झेंडा व दहशतवाद्यांच्या प्रतिमा जमलेल्या हिंदू बांधवांनी पायदळी तुडवून नंतर जाळण्यात आल्या.
या आंदोलनातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाकिस्तानला जगाच्या नकाशातून हटवण्याची मागणी करणारे निवेदन मेलद्वारे पाठवण्यात आले. हिंदू संस्कृती आणि देशभक्तीच्या घोषणांनी वातावरण भारून गेले होते.
या आंदोलनात जिल्हाध्यक्ष संदीप सासने, विनोद पालकर, मनोहर सोरप, मालोजी केरकर, अविनाश शेलार, तसेच महाराष्ट्र प्रदेश महिला अध्यक्ष सौ. स्वाती राजपूत, जिल्हा महिला अध्यक्ष मीनाक्षी डोंगरसाने, प्रियंका राजपूत आदी मान्यवर व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
दहशतवादी हल्ल्याचा सकल हिंदू समाजाकडून जाहीर निषेध
|