बातम्या

श्रीपतराव चौगुले महाविद्यालयात नवनिर्वाचित शिक्षक आमदार कौस्तुभ गावडे यांचा जाहीर सत्कार!

Public felicitation of the newly elected Teachers


By nisha patil - 3/11/2026 11:39:49 PM
Share This News:



श्रीपतराव चौगुले महाविद्यालयात नवनिर्वाचित शिक्षक आमदार कौस्तुभ गावडे यांचा जाहीर सत्कार!

शिक्षण क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध; शिक्षकांच्या प्रश्नांना विधिमंडळात प्रभावी आवाज देण्याचा निर्धार

कोतोली : पुणे विभाग शिक्षक मतदारसंघातून भरघोस मताधिक्याने विजयी झालेले महाराष्ट्र विधान परिषदेतील नवनिर्वाचित आणि देशातील सर्वात तरुण शिक्षक आमदार कौस्तुभ मुरलीधर गावडे यांचा श्रीपतराव चौगुले महाविद्यालय, कोतोली येथे जाहीर सत्कार करण्यात आला. ज्ञानगंगा शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने आयोजित या सत्कार सोहळ्यात शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर, शिक्षक आणि पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहून त्यांचे अभिनंदन केले.
 

या कार्यक्रमाला ज्ञानगंगा शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष मा. के. एस. चौगुले, संस्थेचे सचिव शिवाजी पाटील, संस्थेचे संचालक मा. अजय चौगुले, श्री. मुरलीधर गावडे तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील, प्रा. रवींद्र चौगुले, प्रा. आर. बी. पाटील, प्रा. करणसिंह सरनोबत, कॉलेज विकास समिती सदस्य माजी प्राचार्य डॉ. जे. के .पवार सर, शहाजी कुदळे, सागर वर्पे, बबन चौगुले,संचालिका डॉ. वेदिका चौगुले, खजानीस एम. एस .चौगुले साहेब, सिनेट सदस्या डॉ. उषा पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते आमदार कौस्तुभ गावडे यांचा सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला.

सत्काराला उत्तर देताना आमदार कौस्तुभ गावडे यांनी आपल्या शैक्षणिक वाटचालीविषयी मनोगत व्यक्त केले. शिक्षण हे केवळ पदवी मिळविण्याचे साधन नसून समाजपरिवर्तनाचे प्रभावी माध्यम आहे. शिक्षण क्षेत्रातील प्रश्नांची जाण, शिक्षकांच्या अडचणींची जाणीव आणि विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्याची बांधिलकी या बाबी आपल्या कार्याच्या केंद्रस्थानी राहतील, असे त्यांनी सांगितले. शैक्षणिक संस्थांचे प्रश्न, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न, गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि शिक्षण व्यवस्थेतील सकारात्मक बदल यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
आपल्या मनोगतात ते पुढे म्हणाले की, शिक्षकांनी दाखविलेला विश्वास ही केवळ विजयाची पावती नसून मोठी जबाबदारी आहे. राजकारणाकडे सत्तेचे साधन म्हणून नव्हे, तर समाजसेवेचे आणि लोकांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्याचे माध्यम म्हणून पाहतो. सर्व शैक्षणिक घटकांना सोबत घेऊन शिक्षकांचा सन्मान, स्वाभिमान आणि शिक्षण क्षेत्राचा सर्वांगीण विकास यासाठी प्रामाणिकपणे कार्यरत राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

शिक्षक मतदारसंघातून निवडून आलेल्या लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि शैक्षणिक संस्थांच्या विविध प्रश्नांना विधिमंडळात प्रभावी व्यासपीठ मिळेल, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.
या जाहीर सत्कार सोहळ्याच्या निमित्ताने शैक्षणिक क्षेत्रातील विविध घटकांकडून नवनिर्वाचित आमदार कौस्तुभ गावडे यांचे अभिनंदन करण्यात आले. 

शिक्षकांनी दाखविलेल्या विश्वासाला विकासात्मक कार्यातून उत्तर देण्याचा निर्धार व्यक्त करत हा सत्कार सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. कार्यक्रमास रणजीत वरेकर, सरदार खाडे, चेतन पाटील, उदयसिंह सरनोबत सरकार, एन.सी.सी.लेफ्टनंट मनीषा कुरणे,अरुण जोशी, महाविद्यालयातील सर्व विभागाचे विभागप्रमुख, कोतोली परिसरातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विविध शिक्षक संघटनेचे पदाधिकारी तसेच कौस्तुभ गावडे सर यांच्यावर प्रेम करणारे असंख्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


श्रीपतराव चौगुले महाविद्यालयात नवनिर्वाचित शिक्षक आमदार कौस्तुभ गावडे यांचा जाहीर सत्कार!
Total Views: 16