बातम्या
नगरपरिषदा आणि नगरपंचायती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 2 डिसेंबरला सार्वजनिक सुट्टी जाहीर
By nisha patil - 11/28/2025 4:13:05 PM
Share This News:
नगरपरिषदा आणि नगरपंचायती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 2 डिसेंबरला सार्वजनिक सुट्टी जाहीर
राज्यातील नगरपरिषद व नगरपंचायतींच्या निवडणुकांच्या अनुषंगाने मंगळवार, 2 डिसेंबर रोजी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदारसंघात सार्वजनिक सुट्टी घोषित करण्यात आली आहे. याबाबतची माहिती उपसचिव हेमंत महाजन यांनी दिली.
कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा, चंदगड, गडहिंग्लज, हातकणंगले, हुपरी, जयसिंगपूर कागल, कुरुंदवाड, मलकापूर, मुरगूड, पन्हाळा, शिरोळ आणि वडगाव (कोल्हापूर) या नगरपरिषद व नगरपंचायत क्षेत्रांमध्ये ही सुट्टी लागू राहणार आहे.
विशेष म्हणजे, ज्या मतदारांचे कामकाज नमूद मतदारसंघाच्या हद्दीबाहेर असेल, त्यांनाही या सुट्टीचा लाभ मिळणार आहे. तसेच केंद्र शासनाची कार्यालये, निमशासकीय कार्यालये, सार्वजनिक उपक्रम, बँका इत्यादी संस्थांनाही या अधिसूचनेनुसार सार्वजनिक सुट्टी पाळावी लागणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
नगरपरिषदा आणि नगरपंचायती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 2 डिसेंबरला सार्वजनिक सुट्टी जाहीर
|