शैक्षणिक

प्रा.राजाभाऊ शिरगुप्पे लिखित कर्मयोगी बसवण्णा या पुस्तकाचे प्रकाशन व चर्चा

Publication and discussion of the book Karmayogi Basavanna written by Prof Rajabhau Shirguppe


By nisha patil - 10/31/2025 12:45:28 PM
Share This News:



आजरा (हसन तकीलदार )*:- साहित्यिक प्रवीण बांदेकर व साधनाचे संपादक विनोद शिरसाट यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रा. राजाभाऊ शिरगुप्पे लिखित कर्मवीर बसवण्णा पुस्तकाचे प्रकाशन व चर्चा मृत्युंजकार शिवाजीराव सावंत दालनात आयोजित करण्यात आले आहे.
   शनिवार दि. १ नोव्हेंबर २०२५ रोजी साहित्य संस्कृती मंडळाच्या वतीने प्रकाशित केलेल्या राजाभाऊ शिरगुप्पे यांच्या पुस्तकाचे प्रकाशन होत आहे. डॉ. शिवशंकर उपासे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कार्यक्रमासाठी साहित्य अकादमी प्राप्त लेखक प्रवीण बांदेकर व साधना साप्ताहिकाचे संपादक विनोद शिरसाट यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहेत. मृत्युंजयकार शिवाजीराव सावंत स्मृतीदालनात दुपारी ठीक १२.३० वाजता हा कार्यक्रम होणार आहे.

बसवण्णा आणि त्यांच्या शरण सहकाऱ्यांचे विचार आणि व्यवहार अत्यंत नेमकेपणाने समजून घेण्याची गरज आहे. लिंगायत धर्म म्हणजे काय त्याचप्रमाणे गौतम बुद्धांच्या विचारांचा आधुनिक अविष्कार आहोत याचे भान लिंगायत बांधवाना नक्कीच येईल.
     या कार्यक्रमासाठी जयवंतराव शिंपी, सुधीरभाऊ देसाई, अशोकआण्णा चराटी, अल्बर्ट डिसोझा, प्रा.सुनील शिंत्रे, अंजनताई रेडेकर, संभाजी पाटील, स्वातीताई कोरे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. तरी या कार्यक्रमासाठी आजरा, गडहिंग्लज, चंदगड तालुक्यातील साहित्यप्रेमी व बसवेश्वर विचारांवर श्रद्धा असणाऱ्या स्त्री, पुरुष व युवक युवतींनी उपस्थित राहावे असे आवाहन संयोजन समितीच्या वतीने कॉ. संपत देसाई, सुभाष विभूते, मीना शिरगुप्पे, पुष्पलता घोळसे, कॉ. संजय तरडेकर,कॉ. संजय घाटगे, रणजित कालेकर, सुनील पाटील, चंद्रशेखर बडकडली, काशिनाथ मोरे, कृष्णा सावंत यांनी केले आहे


प्रा.राजाभाऊ शिरगुप्पे लिखित कर्मयोगी बसवण्णा या पुस्तकाचे प्रकाशन व चर्चा
Total Views: 479