बातम्या
पुढारी महा ICONS 2026 सन्मानाने डॉ. युवराज येडूरे यांचा गौरव
By nisha patil - 5/6/2026 10:42:44 AM
Share This News:
पुढारी महा ICONS 2026 सन्मानाने डॉ. युवराज येडूरे यांचा गौरव
कोल्हापूर : सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करून समाजपरिवर्तनाची चळवळ उभी करणाऱ्या महा एनजीओ डेव्हलपमेंट असोसिएशनला प्रतिष्ठेचा "पुढारी महा ICONS 2026" सन्मान प्राप्त झाला आहे. संस्थेचे संस्थापक व अध्यक्ष डॉ. युवराज रामचंद्र येडूरे यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात येणाऱ्या विविध लोकहितकारी उपक्रमांची दखल घेत हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
शिक्षण, महिला सक्षमीकरण, युवक विकास, सामाजिक जनजागृती, पर्यावरण संवर्धन तसेच गरजू व वंचित घटकांच्या विकासासाठी संस्था सातत्याने कार्यरत आहे. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत विकासाच्या संधी पोहोचविण्याच्या उद्देशाने संस्थेने राबविलेल्या उपक्रमांमुळे अनेकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडून आले आहेत.
हा सन्मान स्वीकारल्यानंतर डॉ. युवराज येडूरे यांनी भावना व्यक्त करताना सांगितले की, "हा पुरस्कार केवळ माझा नसून संस्थेच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, स्वयंसेवक आणि हितचिंतकांचा आहे. समाजसेवेच्या क्षेत्रात आणखी व्यापक व प्रभावी काम करण्याची प्रेरणा या सन्मानामुळे मिळाली आहे."
राज्यस्तरीय पातळीवर मिळालेल्या या गौरवामुळे महा एनजीओ डेव्हलपमेंट असोसिएशनच्या कार्याला नवी ओळख मिळाली असून विविध सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांनी डॉ. युवराज येडूरे यांचे अभिनंदन केले आहे.
"समाजहितासाठी केलेल्या कार्याची ही महत्त्वपूर्ण पोचपावती असून भविष्यातही समाजविकासासाठी अधिक जोमाने आणि कटिबद्धतेने कार्यरत राहू," अशी भावना डॉ. येडूरे यांनी यावेळी व्यक्त केली.
पुढारी महा ICONS 2026 सन्मानाने डॉ. युवराज येडूरे यांचा गौरव
|