विशेष बातम्या
पुणे–बंगळूर महामार्गावरील वाहतूक कोंडी गंभीर; आमदार अमल महाडिक यांनी केली पाहणी
By nisha patil - 10/22/2025 11:56:08 PM
Share This News:
कोल्हापूर, दि. २२ :पुणे–बंगळूर राष्ट्रीय महामार्गाचे सहा पदरीकरणाचे काम सुरू असल्याने वाहतूक कोंडीची समस्या गंभीर झाली आहे. सणासुदीच्या काळात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत असून वाहनधारकांची गैरसोय होत आहे.
या पार्श्वभूमीवर आमदार अमल महाडिक यांनी कागल ते शिरोली फाटा दरम्यानच्या महामार्गाची पाहणी केली. महामार्ग पोलिसांनी अतिरिक्त मनुष्यबळ नियुक्त करावे, सेवा रस्त्यांचे काम पूर्ण करावे आणि खड्डे त्वरित बुजवावेत, अशा सूचना त्यांनी दिल्या.
महाडिक यांनी संबंधित अधिकाऱ्यांना उड्डाणपूलांची कामे जलद गतीने पूर्ण करण्याचे आणि शक्य तिथे बायपास रस्ते उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले. पाहणीदरम्यान राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी व महामार्ग पोलिस अधिकारी उपस्थित होते.
पुणे–बंगळूर महामार्गावरील वाहतूक कोंडी गंभीर; आमदार अमल महाडिक यांनी केली पाहणी
|