ताज्या बातम्या

पुणे हादरलं! PSI परीक्षेत राज्यात पहिली आलेली अश्विनी केदारीचं दुर्दैवी निधन

Pune shocked


By nisha patil - 9/9/2025 11:55:17 AM
Share This News:



 

पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या 2023 च्या PSI परीक्षेत मुलींमध्ये राज्यात प्रथम क्रमांक मिळवून संपूर्ण राज्याचं लक्ष वेधून घेणारी अश्विनी बाबुराव केदारी (वय ३०, पाळू, खेड तालुका, पुणे) हिचं उपचारादरम्यान निधन झालं.

२८ ऑगस्ट रोजी सकाळी अभ्यासासाठी उठलेल्या अश्विनीने ड्रममध्ये इलेक्ट्रिक हिटरने पाणी गरम केले होते. मात्र अचानक हिटरचा शॉक लागून ड्रम उलटला आणि उकळतं पाणी तिच्या अंगावर पडलं. यात ती ८० टक्के भाजली. तत्काळ तिला पिंपरी-चिंचवडमधील डी.वाय. पाटील रुग्णालयात दाखल करण्यात आलं. गेल्या ११ दिवसांपासून ती मृत्यूशी झुंज देत होती, परंतु अखेर तिने प्राण सोडले.

शेतकरी कुटुंबातून येऊन अखंड परिश्रम, जिद्द आणि संघर्षाच्या जोरावर अश्विनीने PSI परीक्षेत यश मिळवलं होतं. जिल्हाधिकारी होण्याचं तिचं स्वप्न होतं. तिच्या अचानक जाण्याने संपूर्ण पुणे जिल्ह्यासह राज्यभर शोककळा पसरली आहे.

 


पुणे हादरलं! PSI परीक्षेत राज्यात पहिली आलेली अश्विनी केदारीचं दुर्दैवी निधन
Total Views: 278