कृषी
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६ शेतकऱ्यांना मोठा दिलासा
By nisha patil - 6/27/2026 12:53:03 PM
Share This News:
राज्य शासनाने जाहीर केलेली ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६’ ही महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी मोठा आर्थिक दिलासा ठरत आहे. कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या शेतकऱ्यांना स्थैर्य देणे आणि त्यांना पुन्हा शेतीसाठी सक्षम करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.. ही योजना केवळ कर्जमाफीपुरती मर्यादित नसून शेतकऱ्याच्या संपूर्ण आर्थिक पुनर्बांधणीचा एक व्यापक प्रयत्न मानला जात आहे.
‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६’ अंतर्गत पात्र शेतकऱ्यांचे थकीत पीक कर्ज माफ करणे तसेच नियमित कर्जफेड करणाऱ्यांना प्रोत्साहन देणे यावर भर देण्यात आला आहे. ही योजना शेतकऱ्यांना केवळ तात्पुरता दिलासा न देता दीर्घकालीन आर्थिक स्थैर्य देण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल आहे. महाराष्ट्रातील शेतकरी हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आहे.
मात्र, निसर्गातील अनिश्चितता, वाढता उत्पादन खर्च आणि बाजारभावातील चढ-उतार यामुळे शेतकरी कर्जाच्या संकटात सापडत आहेत.पश्चिम महाराष्ट्रातील ऊस, भात, ज्वारी, मका, भाजीपाला आणि फळबाग शेतीवर या संकटांचा मोठा परिणाम दिसून येतो.
अशा पार्श्वभूमीवर ही योजना शेतकऱ्यांना नवसंजीवनी देणारी ठरत आहे.कर्जमुक्तीनंतर शेतकऱ्यांना पुन्हा पीक कर्ज मिळण्याचा मार्ग मोकळा होईल. त्यामुळे बियाणे, खते, औषधे आणि आधुनिक तंत्रज्ञानासाठी आवश्यक भांडवल सहज उपलब्ध होईल.ठिबक सिंचन, यांत्रिकीकरण आणि पीक विविधीकरण याकडे शेतकऱ्यांचा कल वाढून उत्पादनक्षमता सुधारण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती वर्षानिमित्त त्यांच्या लोकाभिमुख कार्याला अभिवादन म्हणून या योजनेला विशेष ऐतिहासिक महत्त्व देण्यात आले आहे.
या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना खालील सुविधा मिळणार आहेत:
- ₹2 लाखांपर्यंत थकीत अल्पमुदत पीक कर्ज माफी
- ₹2 लाखांपेक्षा जास्त थकबाकीसाठी ‘एकवेळ समझोता’ योजना
- नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ₹50,000 पर्यंत प्रोत्साहनपर लाभ
- थकीत पीक कर्ज असलेले शेतकरी
- नियमित कर्जफेड करणारे पात्र शेतकरी
- अल्पमुदत कृषी कर्ज घेणारे शेतकरी
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६
|