बातम्या

पन्हाळ्यातील बुधवारपेठेत पुन्हा अजगरचे दर्शन ;  भीतीचे वातावरण

Python sighting again at Budhwar Peth in Panhala


By nisha patil - 4/17/2025 4:24:44 PM
Share This News:



पन्हाळ्यातील बुधवारपेठेत पुन्हा अजगरचे दर्शन ;  भीतीचे वातावरण

वनविभागाच्या तत्परतेमुळे अजगर पकडला; ग्रामस्थांनी मानले आभार

पन्हाळा तालुक्यातील बुधवारपेठ या गावात गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने अजगर दिसत असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या अजगराने नुकतेच एका घरात प्रवेश केल्याने ग्रामस्थांची धावपळ उडाली.

तत्काळ परिस्थितीची माहिती पन्हाळा वनविभागाला देण्यात आली. यानंतर पन्हाळा वन्यजीव बचाव पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत अजगराला सुरक्षितपणे पकडले. त्यानंतर त्या अजगराला त्याच्या मूळ वन अधिवासात सोडून देण्यात आले.

ही संपूर्ण कारवाई पन्हाळा वनपरीक्षेत्र अधिकारी श्री. अनिल मोहिते, परिमंडळ वन अधिकारी श्री. सागर पटकारे व वनरक्षक श्री. संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. बचाव पथकातील अजिंक्य बच्चे, रोहित जाधव आणि किरण कुंभार यांनी ही धाडसी कामगिरी यशस्वीरित्या पार पाडली.

गावकऱ्यांनी वनविभागाच्या या तत्परतेचे कौतुक करत आभार मानले असून, अशा प्रसंगी वेळेवर मदत मिळाल्याने त्यांना दिलासा मिळाल्याचे सांगितले.


पन्हाळ्यातील बुधवारपेठेत पुन्हा अजगरचे दर्शन ;  भीतीचे वातावरण
Total Views: 105