बातम्या

यमगे ग्रामपंचायतीच्या पाच वर्षांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह; शिवसेना ठाकरे गटाने मागितला हिशेब

Questions raised over the fiveyear performance of the Yamge Gram Panchayat


By nisha patil - 4/11/2026 3:03:36 PM
Share This News:



यमगे ग्रामपंचायतीच्या पाच वर्षांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह; शिवसेना ठाकरे गटाने मागितला हिशेब

कागल, प्रतिनिधी : अजित बोडके यमगे (ता. कागल) येथील ग्रामपंचायतीच्या २०२१ ते २०२६ या पाच वर्षांच्या कारभारावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.

शिवसेना कागल तालुका प्रमुख, शेतकरी सेनेचे नवनाथ जयवंत पाटील यांनी दि. २ नोव्हेंबर २०२६ रोजी यमगे ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक / प्रशासक यांना लेखी निवेदन दिले. ग्रामस्थ म्हणून पाच वर्षात केलेल्या कामांची माहिती १० दिवसात लेखी द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

मागण्या अशा :
१) १५ व्या वित्त आयोगातून पाच वर्षात किती निधी आला व कोठे खर्च झाला?
२) त्याची वर्षनिहाय माहिती द्यावी.
३) पाच वर्षात किती घरकुले मंजूर झाली व किती पूर्ण झाली?
४) गावात डेंग्यूची साथ असताना ग्रामपंचायतीने काय कारवाई केली व पुढील योजना काय?
५) स्वच्छ पाणी, गटारी व रस्ते स्वच्छ होईपर्यंत घरफाळा व पाणीपट्टी वसूल करू नये.

सध्या यमगेत डेंग्यू, पाणी टंचाई आणि स्वच्छतेचा प्रश्न गंभीर असताना शिवसेनेने प्रशासनाला जाब विचारल्याने चर्चेला उधाण आले आहे. १० दिवसात माहिती न दिल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.


यमगे ग्रामपंचायतीच्या पाच वर्षांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह; शिवसेना ठाकरे गटाने मागितला हिशेब
Total Views: 7